वाढवण बंदर विरोधात वाढवण परिसरातील गावांचा असलेला आक्रोश, सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती दिनानिमित्त झाई ते आरोंदा या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वसलेल्या मच्छीमार गावांनी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या व मच्छीमार संघटनांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत मच्छिमार गावातील मासे बाजार मच्छी मार्केट, भाजीपाल मार्केट, डायमेकिंग व्यवसाय, स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद ठेवला. मुख्य रस्त्यांच्या बाजूला गावोगावच्या लोकांनी मानवी साखळी तयार करून सरकारला खणखणीत इशारा दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- कारवाईत पक्षपात? ; राजकीय विरोधी गटातील उमेदवारांनाच अतिक्रमण प्रकरणी नोटिसा

वाढवण बंदर परिसरातील धाकटी डहाणू ते चिंचणी खाडीनाका येथील मुख्य रस्त्याच्या कडेला १० किलोमीटर लांबीची आठ ते दहा हजार लोकांची प्रचंड मोठी मानवीसाखळी तयार केली होती. या मानवी साखळीत वाढवण, वरोर, चिंचणी, बहाड, पोखरण, धाकटीडहाणू, गुंगवाडा, तडीयाळे, वासगाव, ओसारवाडी, तणाशी, चंडीगाव, दांडेपाडा, अशी अनेक गावे सामील झाली होती.

हेही वाचा- इराणी रस्त्यावर हातगाडय़ांचा अडथळा ; डहाणूत फेरीवाल्यांचा मनमानी कारभार

यातील शेकडो महिलांनी एकाच रंगाच्या साड्या, तर शेकडो तरुणांनी “एकच जिद्द वाढवण बंदर रद्द” चे घोषणापत्र लिहिलेले टी-शर्ट परिधान केले होते, या मानवीसाखळीत वाढवण बंदर विरोधात जब बनेगा वाढवण बंदर, तब डूबेगी मुंबई, समुद्र आमच्या कोळ्यांचा, नाही कुणाच्या बापाचा, अशा अनेक घोषणानी आसमंत दुमदुमून गेला होता, मानवी साखळीत तान्ही लहान बाळ घेऊन काही महिला सहभागी झाल्या होत्या तर आभालवृद्ध, तरुण-तरुणी, मुले, मोठ्या संख्येने सामील होऊन, मच्छीमार, शेतकरी, बागायतदार, डायमेकर व्यावसायिक, यांना उदध्वस्त करणारे,वाढवण बंदर कायमचे हद्दपार करण्याची मागणी करीत आहेत.

हेही वाचा- माशांच्या जाळय़ात प्लास्टिक कचरा ; सागरी प्रदूषणामुळे पारंपरिक मासेमारीला धोका

यावेळी वाणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कोळी, अल्पेश विसे, यांनी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता, शिवाय राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी ही मागविण्यात आली होती, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने, मानवी साखळी आंदोलन शांततेत पार पाडण्याच्या केलेल्या आवाहनाला येथील जनतेने प्रचंड प्रतिसाद दिल्याने, हे आंदोलन शांततेत पार पडून, पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Human chain and village close agitation against wadhwan port project palgher dpj