लोकसत्ता वार्ताहर

कासा : डहाणू तालुका चिकूसोबतच वेगवेगळ्या मिरची पिकांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. डहाणू तालुक्यात ११३५ हेक्टर च्या आसपास क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड केली जाते. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. एप्रिल महिना सुरू झाल्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यातच काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. तीव्र उष्णता, ढगाळ वातावरण व पहाटेच्या वेळेस पडणारी थंडी यामुळे मिरची पिकावर मोठ्या प्रमाणात रोगराई वाढली आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

डहाणू तालुक्यात मिरची ११३५ हेक्टर लागवड आहे त्यातील निम्म्यापेक्षा जास्त मिरची मिरचीच्या झाडावरील रोगामुळे लाल पडू लागले आहे. डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात मिरची उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. लहरी हवामान, त्यात होणारे सततचे बदल आणि मिरची पिकांवर झालेले रोगांचे आक्रमण यामुळे मिरची पीक गंभीर संकटात आहे. परिणामी, अनेक ठिकाणी मिरची लाल पडून उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

सध्या डहाणू तालुक्यात थंडी आणि उन्हाचा अचानक होणारा तफावत, यामुळे मिरचीच्या झाडांवर थ्रिप्स, माइट्स आणि व्हाईट फ्लायसारख्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या रोगांमुळे मिरचीचे झाड सुकत असून, फळांवर डाग पडत आहेत आणि मिरची लालसर रंगात परावर्तीत होत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे आणि मिरचीचा दर्जाही खालावला आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षांपासून थ्रिप्स या किडीने विशेषतः फुलांमध्ये लपून राहून पीक पूर्णतः नष्ट करण्याचा धोका निर्माण केला आहे. या किडीवर नियंत्रण मिळवणं अवघड होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणात तिखट मिरची, आचारी मिरची आणि भोपळी मिरचीचे उत्पादन घेतले जाते. एकरी साधारणतः दोन लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, सध्याची स्थिती पाहता शेतकऱ्यांना उत्पादनातून खर्चही निघेल की नाही, अशी चिंता सतावत आहे. डहाणूतील अनेक शेतकऱ्यांनी सध्या मिरची लालसर पडत असल्याचे निदर्शनास आणून दिलं असून, हे चिल्ली क्रॉपवर आलेल्या आजाराचं लक्षण असल्याचं कृषी तज्ज्ञांचं म्हणणं आहे. योग्य मार्गदर्शन, वेळेत औषध फवारणी आणि हवामानातील स्थैर्यच या संकटावर उपाय होऊ शकतो, असं डहाणू कृषी अधिकाऱ्यांचं मत आहे.

डहाणू तालुका चिकूसोबतच वेगवेगळ्या मिरची पिकांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. डहाणू तालुक्यात ११३५ हेक्टर च्या आसपास क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड केली जाते. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. एप्रिल महिना सुरू झाल्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यातच काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. तीव्र उष्णता, ढगाळ वातावरण व पहाटेच्या वेळेस पडणारी थंडी यामुळे मिरची पिकावर मोठ्या प्रमाणात रोगराई वाढली आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.