पालघर : फळभाज्यांचे आयुष्य वाढवण्यासाठी एका तंत्रज्ञानाद्वारे खोलीच्या तापमानात त्यांचे निर्जलीकरणाचा प्रकल्प पालघरमध्ये उभारण्यात आला आहे. या प्रकल्पात ७५ पेक्षा अधिक फळे, भाज्या, मसाले, औषधी वनस्पती, कडधान्य व इतर अन्न पदार्थ यांचे निर्जलीकरण करण्यात यश आले आहे. वाणगाव (चंडीगाव) येथील सुश्रुत अनिल पाटील याने हा प्रकल्प उभारला आहे. त्याने त्याच्या पद्धतीने निर्जलीकरण करताना उत्पादनाचा रंग, सुगंध, चव व पोषणमूल्य कायम ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याने त्याच्या उत्पादनांना देश, विदेशात मागणी आहे. वाणगाव येथील ज.म. ठाकूर विद्याालयातून शालेय शिक्षण घेतल्यानंतर कांदिवली येथील ठाकूर महाविद्याालयातून बायोटेक्नॉलॉजी या विषयात सुश्रुत यांनी पदवी प्राप्त केली.
शेतकरी कौटुंबिक पाश्र्वभूमी असणाºया या तरुणाने शेती पूरक व्यवसाय सुरू करण्याचे निश्चित केले. या व्यवसायात त्याचे चुलत भाऊ श्रेयस सुरेंद्र पाटील (३६) यांचा देखील महत्त्वाचा सहभाग असून नोकरी सोडून ते या व्यवसाय वृद्धीसाठी योगदान देत आहेत. अशा पद्धतीने कृषी उत्पादनाचा निर्जलीकरण करण्याचा या परिसरातील हा एकमेव प्रकल्प आहे. या उद्योगातून कृषी व अन्य क्षेत्रात शिकणाºया विद्यााथ्र्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून कृषी उत्पादनाचे उत्तम गुणवत्ता राखून त्यांचा दीर्घकाळ वापर करण्यासाठी आपली उत्पादन उपयुक्त असल्याचे या तरुण उद्योजकांचे म्हणणे आहे. सौर ऊर्जा, विद्याुत ऊर्जा व इतर पद्धतीने सुरू असलेल्या निर्जलीकरण प्रकल्पांचे फायदे – तोटे यांचे अभ्यास व मूल्यांकन आयुष्य वाढवण्यासाठी फळभाज्यांचे तंत्रज्ञानाद्वारे निर्जलीकरण करून मूळ पदार्थाचे गुणधर्म कायम ठेवण्याच्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञान सुश्रुत याने विकसित केले आहे. या क्षेत्रातील अनेक तज्ञ, मार्गदर्शक व सल्लागार यांची त्यांनी मदत घेतली आहे. आगामी काळात ब्लूबेरी व किवीची उत्पादने बाजारात आणण्याचा सुश्रुत पाटील यांचा मानस आहे.
पद्माविभूषण शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली व संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून ३० मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथे यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या तर्फे फळ प्रक्रिया व्यवसायतील नाविन्य आणि सामाजिक जोड याबद्दलचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्काराने (युवा इनोव्हेटर) आरोग्यमंत्री राजेश टोपे व संभाजीनगर जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुश कदम यांच्या हस्ते होतकरू उद्योजक सुश्रुत अनिल पाटील (वाणगांव) याला पुरस्कारित करण्यात आले.
काय आहे प्रकल्प?
हवेच्या नियंत्रित वापराने २४ ते ३४ डिग्री सेल्सिअस तापमानात निर्जलीकरण करण्यासाठी वाणगाव (आसनगाव) परिसरात सुमारे चार कोटी रुपये खर्च करून ६५०० चौरस फुटाचा कारखाना उभारला आहे. सध्या ६० पेक्षा अधिक महिला कर्मचारी काम करीत असून घाऊक विक्रीसाठी ७५ उत्पादने बाजारात आहेत. यामध्ये स्थानिक फळ, भाज्या, पालेभाज्या, मसाल्याचे पदार्थ, कडधान्य, औषधी वनस्पती, बियांपासून तयार होणारे उत्पादनांचा समावेश आहे. तसेच जांभु, आंबा, चिकू, अननस, स्ट्रॉबेरी व सफरचंद ही उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
निर्जलीकरण म्हणजे काय?
फळभाज्यांच्या निर्जलीकरण करणे म्हणजे फळे आणि भाज्यांमधील पाणी कमी करर्णे ंकवा ते काढून टाकणे. यामुळे ऊर्जा खर्च कमी होतो. या प्रक्रियेत फळे आणि भाज्या वाळवल्या जातात. त्यातील पाणी वाफवले जाते. यामुळे फळे आणि भाज्या टिकून राहतात. पाणी कमी झाल्यामुळे बुरशी आणि जीवाणूंची वाढ खुंटते. वजन आणि आकारदेखील कमी होतो. ज्यामुळे वाहतूक आणि साठवणूक सोयीची होते.