• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. hatkanagale five loksabha candidates fights in general election 2024 maharashtra politics spl

Loksabha Election 2024 : हातकणंगलेमधील पंचरंगी लढत माने आणि शेट्टींचं गणित बिघडवणार? कोणाचा होईल विजय?

हातकणंगले लोकसभेच्या रिंगणात पंचरंगी लढतीमुळे चुरस वाढली आहे.

April 16, 2024 18:27 IST
Follow Us
  • hatkanagale loksabha candidates
    1/10

    हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक वेगवेगळी वळणे घेत, आता पंचरंगी लढतीवर पोहोचली आहे.

  • 2/10

    हातकणंगलेत महायुतीकडून शिंवसेनेचे (शिंदे गट) खासदार धैर्यशील माने हे रिंगणात आहेत.

  • 3/10

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी धैर्यशील मानेंना आव्हान देत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

  • 4/10

    तर, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची (उबाठा) उमेदवारी शाहूवाडी पन्हाळ्याचे आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना जाहीर केली आहे.

  • 5/10

    वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांना हातकणंगलेत उमेदवारी दिली आहे.

  • 6/10

    या उमेदवारांची चौरंगी लढत होणार, ही चर्चा होत असतानाच पत्रकार परिषद घेऊन इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

  • 7/10

    त्यामुळे हातकणंगलेमध्ये पंचरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • 8/10

    धेर्यशील माने विद्यमान खासदार आहेत आणि त्यांच्यामागे महायुतीची ताकद आहे.

  • 9/10

    तर हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांचीही ताकद मोठ्या प्रमाणावर आहे.

  • 10/10

    त्यामुळे ही पंचरंगी लढत मुख्यतः माने आणि शेट्टी यांच गणित बिघडवणार की इतर तीन उमेदवारांपैकी कोणी बाजी मारणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. हातकणंगलेमध्ये ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे.

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsशिवसेनाShiv Sena

Web Title: Hatkanagale five loksabha candidates fights in general election 2024 maharashtra politics spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.