-
महाराष्ट्रासह देशभरातील १२ राज्यातील ८८ जागांसाठी आज दुसऱ्या टप्यातील मतदान पार पडले. यावेळी विविध राजकीय नेते, अभिनेते आणि खेळाडूंनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजपाचे नेते अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये मतदान करत आपले कर्तव्य पार पाडले. ( फोटो – एएनआय वृत्तसंस्था )
-
प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनीही आज सपत्निक मतदानाचा हक्क बजावला. बच्चू कडू यांनी काल रक्तदान करून आज सकाळी मतदान केले. लोकसभा निवडणुकीच्या मतदानातून क्रांती घडेल, असा विश्वास बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केला. विशेष म्हणजे बच्चू कडू यांनी आतापर्यंत ११५ वेळा रक्तदान केले आहे. ( फोटो – एएनआय वृत्तसंस्था )
-
अमरावती लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांनीही आज आपला मतदानाचा हक्क बजावला. ( फोटो – एएनआय वृत्तसंस्था )
-
नवनीत राणा यांच्याबरोबरच त्यांचे पती आमदार रवी राणा यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. ( फोटो – एएनआय वृत्तसंस्था )
-
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही त्यांच्या तिवसा विधानसभा मतदार संघात मतदान करत आपला मतदानाचा हक्क बजावला. ( फोटो – एएनआय वृत्तसंस्था )
-
काँग्रेस नेते सुनील देशमुख यांनीही सपत्निक मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी नागरिकांनीही मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. ( फोटो – एएनआय वृत्तसंस्था )
-
राज्यातील नेत्यांबरोबर देशभरातील नेत्यांनीही मतदान करत आपले कर्तव्य पार पडले. ज्येष्ठ समाजसेविका आणि राज्यसभेच्या सदस्या सुधा मूर्ती यांनी त्यांच्या बंगळुरू लोकसभा मतदारसंघात मतदान करत मतदानाचा हक्क बजावला. तसेच ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात होणाऱ्या कमी मतदानावरून त्यांनी खंतही व्यक्त केली. ( फोटो – एएनआय वृत्तसंस्था )
-
राजकीय नेत्यांबरोबर अभिनेते प्रकाश राज यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना, सशक्त लोकशाहीसाठी नागरिकांनीही घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. ( फोटो – एएनआय वृत्तसंस्था )
-
भाजपा नेते तेजस्वी सूर्या यांनीही आज आपला मतदानाचा हक्क बजावला. ( फोटो – एएनआय वृत्तसंस्था )
-
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी तिरुवनंतपुरममध्ये मतदान केले. ( फोटो – एएनआय वृत्तसंस्था )
-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांनीही आपल्या बंगळुरु लोकसभा मतदानसंघात मतदान करत मतदानाचा हक्क बजावला. ( फोटो – एएनआय वृत्तसंस्था )
-
माजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही आज आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी नागरिकांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. ( फोटो – एएनआय वृत्तसंस्था )
PHOTO : नवनीत राणा, सुधा मूर्ती ते निर्मला सीतारमण; दुसऱ्या टप्प्यात राजकीय नेत्यांसह अभिनेते आणि खेळाडूंनी बजावला मतदानाचा हक्क
देशभरातील १२ राज्यातील ८८ जागांसाठी आज दुसऱ्या टप्यातील मतदान पार पडले. यावेळी विविध राजकीय नेते, अभिनेते आणि खेळाडूंनी आपला मतदानाचा हक्क बजावला
Web Title: Navneet rana to sudha murty many political leaders actors and cricketers cast their vote in phase 2 loksabha election spb