• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. cm eknath shinde claims secret meeting between uddhav thackeray and narendra modi latest marathi news spl

मविआ सरकारच्या काळात उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात गुप्त बैठकीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा; म्हणाले….

एकाचवेळी मविआ आणि महायुती दोघांनाही फसवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला, असा आरोप एकनाथ शिंदेंनी केला आहे.

May 15, 2024 15:30 IST
Follow Us
  • eknath shinde news
    1/9

    महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे हे भाजपाबरोबर जाण्यास तयार होते आणि त्यासाठी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात बैठकही झाली होती, असा दावा सध्या महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

  • 2/9

    या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 

  • 3/9

    भाजपाबरोबर जाण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली होती. ही बाब खरी आहे, असे ते म्हणाले. एपीबी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझा व्हिजन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

  • 4/9

    एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
    “पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर दिल्लीत बैठक झाली, हे सर्वांना माहिती आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात वैयक्तिक बैठक झाली होती. त्या बैठकीत भाजपाबरोबर जाण्याबाबत चर्चा झाली होती.”

  • 5/9

    या बैठकीचा तपशील मी आता सांगणार नाही. मात्र, ही बैठक झाली, हे खरं आहे. याचाच अर्थ उद्धव ठाकरेंनी आधी भाजपा आणि महायुतीला फसवलं, महाराष्ट्रातील जनतेला फसवलं, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आणि दुसऱ्यांना महाविकास आघाडीलाही फसवण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न होता, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.”

  • 6/9

    पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकाही केली.

  • 7/9

    “भाजपा आणि महाविकास आघाडी या दोघांनाही फसवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला. कारण त्यांना खुर्चीचा मोह सुटत नव्हता. त्यांनी विरोधातील १२ आमदारांना निलंबित केले. याशिवाय भाजपाच्या काही आमदारांना तुरुंगात टाकण्याचा आणि भाजपाचे २० ते २५ आमदार फोडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडत होतं”, असे ते म्हणाले.

  • 8/9

    (सर्व फोटो एकनाथ शिंदे या फेसबुक पेजवरुन साभार.)

  • 9/9

    हे देखील वाचा- घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : उद्धव ठाकरे आणि व्यावसायिक भावेश भिंडेच्या फोटोवरून छगन भ

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsशिवसेनाShiv Sena

Web Title: Cm eknath shinde claims secret meeting between uddhav thackeray and narendra modi latest marathi news spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.