Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. know the wealth of bjp candidate bollywood actress kangana ranaut spl

PHOTOS : भाजपा उमेदवार बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतची संपत्ती किती?

कंगना रणौतने तिची संपत्ती उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जाहीर केली आहे. त्याबद्दल जाणून घेऊ.

Updated: May 16, 2024 16:16 IST
Follow Us
    Kangana Ranaut affidavit information
    लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा २० मे रोजी पार पडणार आहे. तर २५ मे रोजी सहावा टप्पा आणि १ जून रोजी सातवा टप्पा पार पडणार आहे. अशात लोकसभा निवडणुकीत बॉलिवूडचे स्टार्सही उतरले आहेत.
    अभिनेत्री कंगना रणौतला हिमाचलच्या मंडी या मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी दिली आहे. 
     मंगळवारी कंगनाने उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तिच्या संपत्तीचं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. 
     यामध्ये कंगना कोट्यवधींची मालकीण असल्याचं समोर आलं आहे.
    कंगना रणौत हिमाचल प्रदेशातल्या मंडीचीच आहे. तिचा जन्म २३ मार्च १९८७ ला झाला आहे. तर कंगना बारावी उतीर्ण आहे. निवडणूक आयोगाला तिने जी माहिती दिली आहे त्यानुसार तिच्याकडे ९० कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे.
    सध्याच्या घडीला तिच्याकडे दोन लाख रुपयांची रोख रक्कम आहे. तसंच बँक खाती, शेअर्स, दागिने, जंगम मालमत्ता हे मिळून तिच्याकडे २८ कोटी ७३ लाख ४४ हजार २३९ रुपयांची मालमत्ता आहे. 
    तर स्थावर मालमत्ता ही ६२ कोटी ९२ लाख ८७ हजार रुपये आहे. तसंच कंगनावर १७ कोटी ३८ लाख रुपयांचं कर्जही आहे असंही स्पष्ट झालं आहे.
    कंगनाकडे ६ किलो ७०० ग्रॅम सोनं आणि दागिने आहेत. ज्याची किंमत ५ कोटींच्या घरात आहे. तर ६० किलो चांदी आहे या चांदीची किंमत ५० लाख रुपये आहे. तसंच कंगनाकडे जे हिऱ्यांचे दागिने आहेत त्यांची किंम ३ कोटींहून अधिक आहे अशीही माहिती प्रतिज्ञापत्रात समोर आली आहे.
    कंगनाला महागड्या कार्सची आवड आहे. 
    तिने दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार तिच्याकडे BMW 7 सीरिज कार आहे तर दुसरी कार मर्सिडिझ बेंझ GLE SUV आहे या दोन कार्सची किंमत १ कोटी ५० रुपये आहे. 
    कंगनाकडे ५० एलआयसी पॉलिसीज आहेत.  या सगळ्या पॉलिसी ४ जून २००८ च्या दिवशी तिने काढल्या होत्या.
     तर कंगनाकडे मणिकर्णिका फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड चे ९ हजार ९९९ शेअर्स आहेत. तर तिने १ कोटींपेक्षा जास्त रक्कम शेअर्समध्ये गुंतवली आहे.
    कंगनाचा मुंबईत पाच बीएचके फ्लॅट आहे. तर मनालीत तिचा बंगला आहे ज्याची किंमत २५ कोटी रुपये आहे. मुंबईतल्या पाच बेडरुमच्या फ्लॅटची किंमत १५ ते २० कोटींच्या घरात आहे. चित्रपट आणि जाहिरातींमधून तिला चांगलं उत्पन्न मिळतं.
    (सर्व फोटो कंगना रणौत या फेसबुक पेजवरुन साभार.)
TOPICS
कंगना रणौतKangana Ranautभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Know the wealth of bjp candidate bollywood actress kangana ranaut spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.