-
आज देशात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान पार पडले. (Express Photo by Amit Chakravarty)
-
आज देशात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी तर महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यासाठी मतदान झाले. (Express Photo by Amit Chakravarty)
-
महाराष्ट्रात एकूण १३ जागांवर आज मतदान प्रक्रिया पार पडली. (Express Photo by Amit Chakravarty)
-
मुंबईतील सर्व सहा मतदारसंघात आज मतदान पार पडले. दरम्यान, राजकीय पुढारी, मोठे बॉलीवूड स्टार्स ते मराठी कलाकार या सर्वांनी आज मतदान केंद्रावर हजेरी लावून मतदानाचा हक्क बजावल्याचे पाहायला मिळाले. (Express Photo by Amit Chakravarty)
-
आजच्या टप्प्यात देशातील मोठ्या उद्योगपतींनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
यावेळी त्यांच्याबरोबर पत्नी नीता अंबानी यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
मुकेश आणि नीता यांचे चिरंजीव आकाश अंबानी यांनीदेखील त्यांच्यासमवेत मतदानाचा अधिकार बजावला. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
याशिवाय आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनीही त्यांच्या कुटुंबीयांसमवेत मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर यांनीही आज मुंबईत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनीही आज मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. (Photo- ANI)
-
महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीदेखील आज मतदानाचा हक्क बजावला. (Photo- Anand Mahindra/X)
मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा ते बिर्ला यांच्यासह इतर उद्योगपतींनीही बजावला मतदानाचा हक्क; पहा फोटो
Lok Sabha Election Voting Updates : देशात आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे. विविध ठिकाणी विविध क्षेत्रातील नागरिकांनी आज त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. देशातील मोठ्या उद्योगपतींनीदेखील आजच्या मतदानात सक्रिय सहभाग घेतला.
Web Title: Ambani birla mahindra the businessmans participate in voting today cast there votes with family members spl