'बागबान', 'चलते-चलते' आणि 'राजनीती'सारख्या प्रसिद्ध चित्रपटांचे संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचे आज सकाळी निधन झाले. (छाया- एक्स्प्रेस वृत्तसेवा) -
गेले अनेक दिवस आदेश यांच्यावर उपचार सूरू होते. परंतु, त्यांची प्रकृती उपचारांना प्रतिसाद देत नव्हती. काही दिवसांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांच्यावरील केमोथेरीपीचे उपचारही थांबवले होते. वयाच्या ४९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. (छाया- एक्स्प्रेस वृत्तसेवा)
आदेश यांचा जन्म मध्य प्रदेशातील जबलपूर येथे झाला होता. प्रसिद्ध संगीतकार जोडी जतिन-ललित यांची बहिन विजेता पंडितसोबत त्यांचा विवाह झाला. त्यांना अनिवेश आणि अवितेश ही दोन मुले आहेत. -
१९९३ मध्ये 'कन्यादान' या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (छाया- एक्स्प्रेस वृत्तसेवा)
-
आदेश श्रीवास्तव यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोकाकूल वातावरण झाले आहे. (छाया- एक्स्प्रेस वृत्तसेवा)
-
त्यानंतर 'चलते चलते', 'बागबान', 'बाबुल', 'कभी खुशी कभी गम' आणि 'राजनीती' यासारख्या चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले. (छाया- एक्स्प्रेस वृत्तसेवा)
-
आजवर १०० हून अधिक चित्रपटांना संगीत देणाऱ्या आदेश श्रीवास्तव यांनी काही चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले होते. (छाया- एक्स्प्रेस वृत्तसेवा)
-
'क्या अदा क्या जलवे तेरे पारो' , 'हाथो मे जो आ गया कल' , 'सोना सोना', 'शावा शावा', 'गुस्ताखियाँ', 'मोरा पिया' या लोकप्रिय गाण्यांना आदेश यांनी संगीत दिले होते. (छाया- एक्स्प्रेस वृत्तसेवा)
-
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'सा रे गा मा पा' मध्ये ते परीक्षक होते. या कार्यक्रमातून संगीत क्षेत्रातील उगवत्या ताऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.
-
-
-
-
-
अलविदा आदेश
‘बागबान’, ‘चलते-चलते’ आणि ‘राजनीती’सारख्या प्रसिद्ध चित्रपटांचे संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचे आज सकाळी निधन झाले. (छाया- एक्स्प्रेस वृत्तसेवा)
Web Title: Aadesh shrivastava dies of cancer a look at his journey in the industry