बॉलीवूड बादशाहा शाहरुख खानने आज ५० व्या वर्षात पदार्पण केले आहे. पण वाढत्या वयासोबत शाहरुख अधिकाधिक तरुण दिसू लागला आहे. त्याच्या स्टाइल आणि फॅशनमध्येही तरुणाईला साजेसे असे बदल झालेले दिसतात. शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या स्टाइलवर एक नजर टाकूया. शाहरुखला जीन्सचे फार वेड आहे. खास करून जेव्हा तो प्रवास करत असतो त्यावेळी तो जीन्स परिधान करण्यास प्राधान्य देतो. तरुणाईची पसंती असलेल्या जीन्सही शाहरुख तितक्याचं आवडीने घालतो. गेल्यावर्षी शाहरुखने माध्यम आणि चाहत्यांसोबत आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळे काढलेले छायाचित्र. डेनिम, पांढरे टीशर्ट त्यावर जॅकेट आणि मिरर ग्लासेस अशा लूकमध्ये नुकतेचं शाहरुखचे विमानतळावर टिपलेले छायाचित्र. अनेक मुलींच्या हृदयात वास्तव्य करणा-या शाहरुख ब्लेझर आणि तुळतुळीत चेहरा या लूकमध्ये अधिक रुबाबदार दिसतो. शाहरुखचा अजून एक ब्लेझरमधील फोटो. पण यावेळी त्याने हलकीशी दाढी वाढविलेली यात दिसते. शाहरुखला काळा रंग फारचं आवडतो असे दिसते. पाहा ना या छायाचित्रात त्याने काळे शर्ट, ट्राउझर आणि काळ्याचं रंगाचे लेदर जॅकेट परिधान केलेल दिसते. शर्ट आणि चेक्स वेस्टकोटमध्ये शाहरुख आणि इरफान खान. शाहरुखचे नवे प्रेम कसे विसरून चालेल. हल्ली शाहरुख बंदनामध्ये दिसतो. डोक्याला कलरफुल कपडा बांधून शाहरुखने त्याचा लूक पूर्ण केला आहे. कार्गो पॅन्ट, टीशर्ट आणि लेदर जॅकेटमधील शाहरुखचा कॅज्युअल लूक. जेव्हा स्टाइलची गोष्ट येते त्यावेळी शाहरुख स्वतःला आरामदायी असतील अशाच कपड्यांची निवड करतो. गोवामध्ये पार्टी करताना त्याने ढगळे टीशर्ट घालण्यास प्राधान्य दिलेले दिसते. तसाचं लूक त्याचा प्रवासावेळीही दिसला.
किंग खान @५०
Web Title: Shah rukh khan 50 bollywood badshahs style file