-
बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या लग्नाच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून गुरूवारी या दोघांनी याबद्दलची अधिकृत घोषणा केली. येत्या ३० एप्रिलला हे कपल विवाहबंधनात अडकणार आहेत. या 'ब्युटीफूल कपल'ने आजवर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्वर शेअर केलेली काही खास क्षणचित्रे..
-
आम्हाला ही बातमी सांगताना आनंद होत आहे. ३० एप्रिलचा दिवस आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे. आमचे लग्न हा खासगी सोहळा असेल, असे या दोघांनी संयुक्त निवेदनाद्वारे सांगितले आहे.
-
बिपाशा आणि करण हे दोघंही अनेकदा एकत्र उपस्थित राहताना दिसले होते. बच्चन कुटुंबियांनी दिवाळी सणाला आय़ोजित केलेल्या खास पार्टीत देखील बिपाशा करणसोबत उपस्थित होती. तेव्हाचा हा एक क्षण..
-
दोघांनीही अनेक सण एकत्र सेलिब्रेट केले आहेत.
-
नुकतेच काही दिवसांपूर्वी दोघांनी 'नाईट ट्रीप'चा आनंद लुटला होता.
-
अलोन चित्रपटात दोघं एकत्र आल्यानंतर दोघांनीही आपापले वाढदिवस एकत्र साजरे केले आहेत. त्याची छायाचित्रे देखील दोघांनी समाजमाध्यमांत प्रसिद्ध केली होती.
-
करणच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन बिपाशाने त्याच्यासोबत गोव्यात केले होते.
-
करणचे हे तिसरे लग्न आहे, तर बिपाशाचे यापूर्वी अभिनेता जॉन अब्राहम याच्याशी प्रेमसंबंध होते
-
सुरूवातीला या दोघांच्या लग्नाला घरच्यांकडून विरोध होता. बिपाशा बसूच्या आईने तर स्पष्टपणे या दोघांच्या नात्याला विरोध करत बिपाशाला करणपासून लांबच राहण्याचा सल्ला दिला होता.
-
दुसरीकडे करणच्या आईलाही बिपाशा सून म्हणून नको होती. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनीही करणला बिपाशापासून दूर होण्याचा सल्ला दिला होता.
-
बिपाशा आणि करण यांनी ‘अलोन’ या भयपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर त्यांच्यातील प्रेमसंबंधांची चर्चा बॉलीवूडमध्ये रंगू लागली होती. दोघांनी याची जाहीर कबुली दिली नसली तरी हे दोघंही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसून आले.
बिपाशाचे ‘शुभमंगल’ ठरले..
Web Title: Bipasha basu karan singh grover to tie the knot photos