• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 8 mistakes deepika padukone could have avoided

दीपिकाच्या आयुष्यातील ‘त्या’ आठ चुका..

April 18, 2016 01:05 IST
Follow Us
  • Deepika Padukone
    1/

    दीपिका पदुकोण

  • 2/

    कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात दीपिका बॉलीवूडमध्ये आपले बस्तान बसवण्याच्या प्रयत्नात होती. त्यावेळी स्ट्रगलिंग कलाकार आणि मॉडेल निहार पांड्या याच्यासोबतच्या प्रेमप्रकरणामुळे ती बरीच चर्चेत राहिली होती. तेव्हा ते ब-याचदा एकत्र दिसत. नंतर दीपिकाच्या यशाचा आलेख उंचावत गेला आणि तसतशा निहारसोबतच्या तिच्या प्रेमसंबंधाच्या चर्चाही थांबल्या.

  • 3/

    दीपिका आणि रणबीर कपूर यांच्यातील प्रेमसंबंधाबाबत तर सर्वांनाच माहिती आहे. त्यावेळी त्यांच्यातील प्रेमप्रकरण हा सर्वाधिक चर्चेचा विषय बनला होता. रणबीरच्या प्रेमात आकंत बुडालेल्या दीपिकाने आपल्या मानेवर 'आरके' चा टॅटूही गोंदवला होता. पण नंतर या दोघांनी एकमेकांपासून वेगळ होण्याचा निर्णय घेतला आणि दीपिका आता आपल्या मानेवरील टॅटूचं काय करणार यावर चर्चा रंगू लागली. अजूनही तो टॅटू दीपिकाच्या मानेवर असून तिने त्यात थोडेसे बदल करून घेतले आहेत.

  • 4/

    'XXX' पूर्वी दीपिकाला 'फास्ट अॅण्ड फ्युरीयस' या हॉलीवूड चित्रपटाची ऑफर आली होती. पण तिने या चित्रपटात तेव्हा काम करण्यास नकार दिला. जर तिने तेव्हा होकार दिला असता तर प्रियांकाप्रमाणे तिचाही हॉलीवूडमधील यशाचा आलेख उंचावला असता.

  • 5/

    चित्रपटसृष्टीतील आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत प्रत्येक कलाकार चित्रपट निवडीत काहीनाकाही चुकी करतोच. 'चांदनी चौक टू चायना' हा चित्रपट निवडण्यातही दीपिकाकडून चूकी झाली. अक्षयसोबत या चित्रपटात झळकलेल्या दीपिकाची जादू तर प्रेक्षकांवर चालली नाहीच पण तो चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगलाच आदळला.

  • 6/

    दीपिकाच्या प्रेमप्रकरणाची मोठी यादी आहे. त्यामध्ये क्रिकेटर युवराज सिंग याचाही समावेश होतो. भारतीय संघाने एकदा सामना जिंकल्यानंतर धोनीने खास पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीत दीपिकानेही उपस्थिती लावली होती. त्याचवेळी युवराज आणि दीपिकाच्या प्रेमाला सुरुवात झाल्याचे कळते.

  • 7/

    दीपिका आणि सिद्धार्थ माल्याने स्टेडियममध्ये एकमेकांचे घेतलेले चुंबन बरेच चर्चेत राहिले होते. आजही त्याबाबत चर्चा केली जाते.

  • 8/

    कतरिनाच्या बिकनी फोटोबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. रणबीरसोबत समुद्र किना-यावर वेळ घालवत असतानाचा तिचा बिकनीतील फोटो व्हायरल झाला होता. त्यावेळी अनेकांनी आपआपली मते प्रदर्शित केली होती. त्यामध्ये दीपिकाचाही समावेश होता. दीपिका म्हणाली होती की, जर तुम्ही सेलिब्रेटी किंवा पब्लिक फिगर असाल तर तुमच्यासोबत अशा गोष्टी होणे स्वाभाविक आहे. त्यासाठी तुम्ही कोणावरही आरोप करू शकत नाही. अशा गोष्टी टाळण्यासाठी आपण स्वतः सतर्क राहणं गरजेच असतं. यावर रागावलेल्या कतरिनाने 'माइन्ड युअर ओन बिझनेस' असे उत्तर दिले होते.

  • 9/

    सुप्रसिद्ध अभिनेता रजनीकांत यांच्यासोबत काम करण्याची प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते. 'कोचादैय्या' या चित्रपटाद्वारे दीपिकालाही ती संधी मिळाली. पण या चित्रपटात ती अॅनिमेटेड रुपात होती. त्यामुळे तिच्या चाहत्यांची बरीच निराशा झाली होती.

TOPICS
दीपिका पदुकोणDeepika Padukone

Web Title: 8 mistakes deepika padukone could have avoided

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.