-
गेले काही महिने 'ती' बॉलीवूड बादशहा शाहरुख खानसोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण करत असल्याची चर्चा होती. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजविणारे सुप्रसिद्ध कलाकार सचिन पिळगावकर यांची ती कन्या. पण आपण एका सुप्रसिद्ध कलाकाराची मुलगी आहोत यातच अडकून न राहता चित्रपटसृष्टीत आपले स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी ती परिश्रम करतेय. आम्ही बोलतोय सचिन-सुप्रिया यांची 'एकुलती एक' लेक म्हणजेच श्रिया पिळगावकर हिच्याबद्दल. श्रियाने 'फॅन' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपटात श्रियाची भूमिका लहान असली तरी तिने आपल्या अभिनयाद्वारे चित्रपट समीक्षकांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकांची मने जिंकली. खुद्द शाहरुखनेही तिच्या अभिनयाची एका कार्यक्रमात प्रशंसा केली. श्रियाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
-
२५ एप्रिल १९८९ रोजी श्रियाचा जन्म झाला.
-
गेल्यावर्षी श्रियाच्या वाढदिवसाला सचिन यांनी तिच्या लहानपणीचा फोटो शेअर करून तिला शुभेच्छा दिल्या होत्या.
-
श्रियाने आपल्या करिअरची सुरुवात 'पेटेंड सिग्नल' (२०१२) आणि 'ड्रेसवाला' (२०१३) या लघुपटाच्या माध्यमातून केली होती.
-
आशा भोसले, सुप्रिया पिळगावकर आणि श्रिया
-
श्रिया पिळगावकर- २५ एप्रिल १९८९
-
रणवीर सिंग आणि श्रिया
'ड्रेसवाला' या लघुपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती श्रियाने स्वतः केली होती. -
त्यानंतर श्रियाने सचिन पिळगावकर यांचीच निर्मित असलेल्या ‘एकुलती एक’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले.
-
श्रियाने दोन इंग्रजी नाटकांमध्ये काम केलंय. अॅक्वेरिअस प्रॉडक्शन्सच्या 'कॉमन पीपल' आणि 'इंटर्नल अफेअर्स' ही दोन इंग्रजी नाटकं तिने केली आहेत.
-
सुप्रिया-सचिन आणि त्यांची एकुलती एक श्रिया
-
श्रियाचे फॅन मुमेन्ट्स
-
दिग्दर्शक अनुराग बसूची निर्मिती असलेल्या 'रिअल एफ एम' या टेलीफिल्मचे दिग्दर्शन तिने केले आहे. या सिनेमाची कथा अनुरागचीच आहे, मात्र त्याचे दिग्दर्शन आकर्ष खुराणा याने केले. या सिनेमासाठी सेकंड युनिट दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी श्रियाला मिळाली.
-
ऑस्कर विजेता दिग्दर्शक क्लॉड लेल्यूश यांच्या 'अ प्लू युन' या फ्रेंच सिनेमात श्रियाने काम केले आहे.
-
रीन सुप्रिम, अमुल लस्सी यांसारख्या जाहिरातींमध्येही ती झळकली आहे. तसेच, शाहिदसोबत तिने सॅमसंगच्या मोबाईलचीही जाहिरात केलीय.
-
श्रियाने कथ्थक या नृत्यप्रकाराचे प्रशिक्षण घेतले आहे.
-
श्रियाचा मराठमोळा लूक
-
ग्लॅमरस श्रिया
-
प्रवास आणि लेखन हे श्रियाचे आवडते छंद आहेत.
-
शाहरुख खान, जितेंद्र जोशी आणि हॅरिसन फोर्ड हे अभिनेत्यांची श्रिया फॅन आहे.
-
श्रियाला अभिनेत्रींमध्ये कंगना रणौत आवडते.
-
जपान, पॅरिस, दुबई, इंग्लंड ही श्रियाची आवडती ठिकाणे आहेत.
ती आली आणि तिने जिंकलं..
Web Title: Know more about shahrukhs fan co star shriya pilgaonkar