-
चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आणि मराठीतील समर्थ लेखिका प्रिया तेंडुलकर यांचा आज स्मृतीदिन आहे. नाटककार विजय तेंडुलकर यांच्या त्या कन्या होत्या.
-
प्रिया यांचे वयाच्या ४२व्या वर्षी १९ सप्टेंबर २००२ रोजी प्रभादेवी येथील त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झालेले.
-
रंगमंच आणि रुपेरी पडद्यावरील छोट्याशा कारकीर्दीतही आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविणाऱया प्रिया तेंडुलकर यांच्या निधनाने एका गुणी अभिनेत्री आणि संवेदनशील लेखिकेला प्रेक्षक आणि वाचकवर्ग मुकला असल्याची भावना त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती.
-
प्रिया यांच्या पर्थिवावर कोणतेही धर्मिक विधी न करता रात्री शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
-
‘दूरदर्शन’वरील ‘रजनी’ या मालिकेने प्रिया तेंडुलकर मराठीबरोबरच अन्य भाषिकांच्याही घराघरात पोहोचल्या आणि तिथूनच त्यांच्या यशाची वाटचाल सुरू झाली.
-
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सहज अभिनयामुळे त्या रसिकांच्या कायम लक्षात राहिल्या.
-
१९७३ मध्ये श्याम बेनेगल यांच्या ‘अंकुर’ या हिंदी चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
-
‘सस्ती दुल्हन महंगा दुल्हा’ या हिंदी चित्रपटात त्यांनी नायिकेची भूमिका केली होती. अलीकडील काळात ‘त्रिमूर्ती’, ‘गुफ्त’, ‘फ्यार, इश्क मुहब्बत’ या हिंदी चित्रपटातून त्यांनी मातेच्या भूमिका केल्या होत्या.
-
मराठीमध्ये ‘गोंधळात गोंधळ’, ‘माळावरचे फूल’, ‘मायबाप’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘माहेरची माणसे’, ‘थोरली जाऊ’, ‘राणीनं डाव जिंकला’, ‘देवता’ या चित्रपटात भूमिका केल्या होत्या.
-
‘ती फुलराणी’ आणि ‘एक हट्टी मुलगी’ या नाटकांमधूनही त्यांनी काम केले होते.
-
प्रिया तेंडुलकर यांनी ‘टॉक शो’ या कार्यक्रमाला लोकप्रियता मिळवून दिली. आधी ‘स्टार फ्लस’ आणि नंतर ‘सब टीव्ही’वर त्यांचा हा कार्यक्रम खूप गाजला.
-
करण राझदान यांच्याबरोबर प्रिया यांचा विवाह झाला होता. मात्र लवकरच ते विभक्त झाले.
-
अभिनयाबरोबरच त्यांनी लेखनही केले होते. डिम्पल प्रकाशनाने त्यांची सर्व पुस्तके प्रसिद्ध केली होती.
-
विजय तेंडुलकर, मेधा पाटकर आणि प्रिया
-
‘ज्याचा त्याचा प्रश्न’, ‘पंचतारांकित’, ‘जन्मलेल्या प्रत्येकाला’, आणि ‘असं ही’ ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत.
-
‘ज्याचा त्याचा प्रश्न’, ‘पंचतारांकित’, ‘जन्मलेल्या प्रत्येकाला’, आणि ‘असं ही’ ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत.यापैकी पहिल्या तीन पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कारही मिळाला होता.
-
प्रिया तेंडुलकर या उत्तम चित्रकार आणि कॉस्च्युम डिझायनरही होत्या.
-
अशोक सराफ आणि प्रिया
-
-
आठवणीतील प्रिया तेंडुलकर
Web Title: Death anniversary of priya tendulkar