• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. royal start of mami film festival

‘मामि’ची ‘रॉयल’ सुरुवात

October 21, 2016 17:39 IST
Follow Us
    • चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकारांनी एकत्र येऊन ऊर्जितावस्था दिलेल्या ‘मामि’ चित्रपट महोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. कसदार अभिनय, वेगळी धाटणी, मनाला भिडणारी संहिता अशा एकाहून एक वैशिष्टय़ांमुळे नावाजले गेलेले ५४ देशांतील १८० चित्रपट या महोत्सवातून दाखवले जाणार आहेत. त्याचबरोबर भारतातील काही प्रदर्शित, अप्रदर्शित चित्रपटांचेही दर्शन या महोत्सवातून घडणार आहे. बॉलीवूड निर्माती किरण राव आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे पोज देताना. (छाया सौजन्यः निर्मल हरिंद्रन)
    • विशेष म्हणजे, मुंबईच्या गतवैभवाची ओळख असलेले आणि गेल्या दोन दशकांपासून पडद्याआड असलेले ‘रॉयल ऑपेरा हाऊस’देखील या महोत्सवाच्या निमित्ताने खुले होत आहे. कधीकाळी वर्षांतील सातच दिवसांपुरता हा महोत्सव जिवंत असे. परंतु यावर्षी १८व्या पर्वात प्रवेश करण्यापूर्वी ‘मामि’ने वर्षभर अनेक कार्यक्रम राबवून रसिकांना गुंतवून ठेवले. आता खऱ्या महोत्सवाचा शुभारंभ गुरुवारपासून ‘रॉयल ऑपेरा हाऊस’च्या साक्षीने रंगला. या वर्षी ५४ देशांतील १८० चित्रपटांबरोबरच भारतीय दिग्दर्शकांचे कथाआशय, शैली मांडणी यात वैविध्य असणारे कित्येक अप्रदर्शित आणि प्रदर्शित चित्रपट पाहण्याची संधी सिनेप्रेमींना मिळणार असून महोत्सवाचा एक संपूर्ण दिवस ‘मराठी टॉकिज’ला देण्यात आला आहे. अभिनेता रितेश देशमुख याने पत्नी जेनेलियासह महोत्सवाला उपस्थिती लावली होती. (छाया सौजन्यः निर्मल हरिंद्रन)
    • मुंबईच्या सांस्कृतिक इतिहासात महत्त्वाचे स्थान असणाऱ्या वैभवी ‘रॉयल ऑपेरा हाऊस’चे दरवाजे १८व्या जियो ‘मामि’ चित्रपट महोत्सवाच्या शुभारंभ सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटप्रेमींसाठी खुले होणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, जगभरातून आलेले चित्रपटकर्मी यांच्या उपस्थितीत २० ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबपर्यंत रंगणाऱ्या या शानदार महोत्सवात खासकरून भारतीय चित्रपटकर्मीचे अनेकविध अप्रदर्शित, प्रदर्शित चित्रपट पाहायला मिळणार आहेत. बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन हे पत्नी जया बच्चन यांच्यासह कार्यक्रमाला उपस्थित होते. (छाया सौजन्यः निर्मल हरिंद्रन)
    • ‘हाफ तिकीट’ या विभागात जगभरात गाजलेले लहान मुलांसाठीचे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. याशिवाय, गेल्या वर्षीपासून सुरू केलेल्या ‘मूव्ही मेला’मध्ये या वर्षी ‘जो जिता वही सिकंदर’ या १९९२ साली गाजलेल्या चित्रपटातील कलाकार मंडळी खुद्द आमिर खानसह २४ वर्षांनी एकत्र येऊन प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. पत्नी किरण रावसह सेल्फीसाठी पोज देताना आमिर खान आणि दंगल चित्रपटात त्याच्या मुलींची भूमिका साकारणा-या अभिनेत्री फातिमा सना शेख आणि सनाया मल्होत्रा. (छाया सौजन्यः निर्मल हरिंद्रन)
    • 1/

      दंगल चित्रपटात फातिमा सना शेख ही ‘गीता फोगट’च्या आणि सनाया मल्होत्रा ‘बबिता कुमारी’च्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘म्हारी छोरिया छोरोसे कम है के?’, असे म्हणणारा आमिर खान या चित्रपटाद्वारे २३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (छाया सौजन्यः निर्मल हरिंद्रन)

    • 2/

      ‘द न्यू मीडिअम’ हा आणखी एक नवीन विभाग महोत्सवात सुरू करण्यात आला असून यात एकेकाळी गाजलेले किंवा चांगले असूनही प्रदर्शित न होऊ शकलेल्या कलाकृती पाहायला मिळणार आहेत. यात शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘अहमाक’ या चित्रपटाचा समावेश आहे. मणी कौल दिग्दर्शित ‘अहमाक’ हा चित्रपट फोदोर दोस्तोवस्की यांच्या ‘द इडियट’ या कादंबरीवर बेतलेला होता. हा चित्रपट १९९१ साली दूरदर्शनवर चार छोटय़ा भागांमध्ये दाखवण्यात आला, त्यानंतर १९९२ मध्ये हा चित्रपट न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला. मात्र अन्य चित्रपटांप्रमाणे रीतसर प्रदर्शित होऊ न शकलेला हा चित्रपट ‘मामि’त पाहण्याची संधी मिळणार आहे. (छाया सौजन्यः निर्मल हरिंद्रन)

    • एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ चित्रपटाचा सिक्वल पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. ‘बाहुबली द कन्क्लुजन’ नावाने प्रदर्शित होणाऱ्या या सिक्वलची एक खास झलक ‘मामि’त पाहायला मिळणार असून यानिमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकार ते व्हीएफएक्स सांभाळणारे तंत्रज्ञ सगळेच या चित्रपटाच्या निर्मितीमागच्या गोष्टींबद्दल गप्पा मारणार आहेत. श्याम बेनेगल आणि अनुराग कश्यप कॅमे-यास पोज देताना. (छाया सौजन्यः निर्मल हरिंद्रन)
    • 3/

      अभिनेत्री कल्की कोचलीन. (छाया सौजन्यः निर्मल हरिंद्रन)

Web Title: Royal start of mami film festival

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.