-
गेल्या बऱ्याच वर्षांपासून अनेक अभिनेत्री चित्रपटसृष्टीमध्ये आल्या. त्यातील काही अभिनेत्रींनी प्रेक्षकांची मने जिंकली खरी. पण, त्या अभिनेत्री प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्याच असे नाही. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम /@danielbauermakeupandhair, @ishwaryaraibachchansword)
-
या सर्व अभिनेत्रींच्या गर्दीत एक चेहरा मात्र प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करत आहे. तो चेहरा म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम /@danielbauermakeupandhair, @ishwaryaraibachchansword)
-
सौंदर्यस्पर्धेमध्ये बाजी मारत हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख प्रस्थापित करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या चित्रपटांमध्ये फारशी सक्रिय नसली तरीही तिच्या चाहत्यांचा आकडा काही कमी झालेला नाही. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम /@danielbauermakeupandhair, @ishwaryaraibachchansword)
-
सौंदर्य, बुद्धिमत्ता याचा सुरेख मेळ असलेली अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम /@danielbauermakeupandhair, @ishwaryaraibachchansword)
-
'सरबजीत', 'ऐ दिल है मुश्किल', 'जज्बा'0यांसारख्या चित्रपटांमधून अॅशने चित्रपटसृष्टीमध्ये पुनरागमन करत अनेकांचीच मने पुन्हा एकदा जिंकली होती हे नाकारता येणार नाही. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम /@danielbauermakeupandhair, @ishwaryaraibachchansword)
-
४३ वर्षीय ऐश्वर्या राय बच्चनने ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन अशा सर्वच भूमिका चोखपणे बजावत प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम /@danielbauermakeupandhair, @ishwaryaraibachchansword)
-
सोशल मीडियावर ऐश्वर्या फारशी सक्रिय नसली तरीही तिच्या चाहत्यांच्या आणि काही मासिकांच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजवरून तिची छायाचित्रे नेहमीच पोस्ट केली जातात. आणि तिची छायाचित्रे पाहताना नकळत एक ओळ उच्चारली जाते, 'आखों कि..गुस्ताखियाँ माफ हो'. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम /@danielbauermakeupandhair, @ishwaryaraibachchansword)
-
(छाया सौजन्य- इन्स्टाग्राम /@danielbauermakeupandhair, @ishwaryaraibachchansword)
‘आखों कि..गुस्ताखियाँ माफ हो’
Web Title: Smoking hot photo shoot of aishwarya rai bachchan see pics