• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actor vinod khanna photo gallery old and latest pics

कभी कभी ऐसे इन्सान भी जनम लेते है….

April 27, 2017 13:38 IST
Follow Us
  • ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून मुंबईतील खासगी रुग्णालायत उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुलं असा परिवार आहे.
    1/

    ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून मुंबईतील खासगी रुग्णालायत उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुलं असा परिवार आहे.

  • 2/

    विनोद खन्ना यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ मध्ये पेशावर येथे झाला. भारत पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचे कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झाले.

  • 3/

    १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमातून विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर अनेक सिनेमात सहाय्यक अभिनेता आणि खलनायकाच्या भूमिका साकारत त्यांनी आपला ठसा उमटवायला सुरुवात केली.

  • 4/

    कविता लालचंद हिराचंद या विनोद खन्ना यांच्या दुसऱ्या पत्नी. या दोघांनी १९९० साली पेडर रोड येथील ब्राइड रेसिडन्टमध्ये खासगी समारंभात विवाह केलेला.

  • 5/

    लता मंगेशकर, विनोद खन्ना आणि डिंपल कपाडिया

  • 6/

    विविध चित्रपटांमध्ये बऱ्याच कलाकारांसोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या विनोद खन्ना यांचे अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे चित्रपट विशेष गाजले. त्यापैकीच काही चित्रपट म्हणजे, 'हेराफेरी' (१९७६), 'खून पसिना' (१९७७), 'अमर अकबर अँथनी' (१९७७), 'परवरिश' (१९७७) आणि 'मुकद्दर का सिकंदर' (१९७८)

  • 7/

    विनोद खन्ना, त्यांची पत्नी कविता खन्ना, मुलगा साक्षी खन्ना आणि मुलगी श्रद्धा खन्ना. (एक्स्प्रेस आर्काइव्ह फोटो)

  • 8/

    १९७१ मध्ये ‘हम तूम और वो’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा मुख्य अभिनेता म्हणून काम केले. विनोद खन्ना यांनी ‘मेरे अपने’, ‘कुर्बानी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रेशमा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘अमर, अकबर, अँथनी’ या सिनेमांमधून आपल्यातील अभिनय गुण दाखवून दिले होते.

  • 9/

    विनोद खन्ना, अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचा 'अमर, अकबर, अँथनी' हा चित्रपट कोणीच विसरू शकत नाही.

  • 10/

    धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, विनोद खन्न, डॅनी डेन्झोप्पा

  • 11/

    विनोद खन्ना आणि सुनील दत्त यांचा दुर्मिळ फोटो.

  • 12/

    १९९७ मध्ये विनोद खन्ना राजकारणात सक्रीय झाले. भाजपाचे पंजाबमधील गुरुदासपुर खासदार म्हणूनही ते निवडून आले होते.

  • 13/

    रजनीकांत आणि विनोद खन्ना

  • 14/

    १९८२ मध्ये कारकिर्दीच्या परमोच्च शिखरावर असतानाच विनोद खन्ना यांनी ओशो रजनीश या त्यांच्या गुरुचा मार्ग स्वीकारला होता. त्यानंतर थेट पाच वर्षांनी विनोद खन्ना यांनी चित्रपसृष्टीत पुनरागमन केलं होतं.

  • 15/

    शम्मी कपूर आणि विनोद खन्ना यांचा एक दुर्मिळ फोटो.

  • 16/

    विनोद खन्ना, झिनत अमान आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा दुर्मिळ फोटो.

  • 17/

    विनोद खन्ना यांनी 'मेरे अपने' मालिकेतही काम केले होते. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीदेखील काम केले होते.

  • 18/

    विनोद खन्ना आणि त्यांची पत्नी कविता खन्ना

  • 19/

    चित्रपटसृष्टीत कारकीर्दीत विनोद खन्ना यांच नाव काही अभिनेत्रींसोबतही जोडलं गेल होतं. त्यातीलच एक अभिनेत्री त्यांच्यापेक्षा वयाने १२ वर्षे लहान होती.

  • 20/

    कभी कभी ऐसे इन्सान भी जनम लेते है…. जो अपना नाम अपनी याद तारीख मे नही…. लोगो के दिलो में मेहफूझ कर जाते है…. हा विनोद खन्ना यांच्या 'दयावान' चित्रपटातील संवाद त्यांच्यासाठीच असल्याचे वाटते.

Web Title: Bollywood actor vinod khanna photo gallery old and latest pics

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.