-
युनिव्हर्सल सेलिब्रिटी असलेल्या प्रियांका चोप्राचा आज ( १८ जुलै ) वाढदिवस आहे. सध्या आपल्या कुटुंबासमवेत सुट्टीवर गेलेली ही देसी गर्ल आता ३४ वर्षांची झाली आहे. प्रियांका ही केवळ प्रतिभावान अभिनेत्री नसून तिने आपल्या स्टायल स्टेटमेण्टने वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरले आहेत. ऑस्कर सोहळ्यावेळी घातलेला ऑफ शोल्डर राल्फ अॅण्ड रुस्सो गाऊन असो किंवा मेट गाला २०१७ मधील राल्फ लॉरेन ट्रेन्च कोट गाऊन असो तिने तिचा प्रत्येक ड्रेस खुबीने घालून तो मिरवलाही. पिग्गी चॉप्सच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यावर्षभरातील तिच्या कॅज्युअल लूक्सवर एक नजर टाकूया.
-
'काय रे रास्कला' चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी प्रियांकाने चोला ब्रॅण्डचा काळ्या रंगाचा स्लिवलेस टॉप आणि राखाडी पॅन्ट घातली होती. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने गळ्यात आम्रपालीचा सिल्वर नेकलेस घातलेला दिसतो.
-
नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत प्रियांकाने शेवाळी रंगाचा जम्पसूट घातला होता.
-
वाढदिवसासाठी प्रियांका भारतात परतलेली तेव्हा ती फ्लोरल मॅक्सी गाऊनमध्ये दिसली होती. या गाऊनसोबत तिने डेनिम जॅकेटही घातले होते.
-
फ्लोरल प्रिन्टेड ड्रेस आणि क्रोशेट हॅटमध्ये प्रियांका
-
लेसी ट्रिम मिडी ड्रेसमध्ये प्रियांका
-
उल्याना सेरगीन्को कोचरने डिझाइन केलेल्या ड्रेसमध्ये प्रियांका
-
द काउन्सिल ऑफ फॅशन डिझायनर्स ऑफ अमेरिका अॅवॉर्ड्स २०१७मधील प्रियांकाचा लूक
-
'बेवॉच'च्या वर्ल्ड टूरवेळी प्रियांकाच्या विविध अदा पाहायला मिळाल्या.
-
'बेवॉच'च्या प्रसिद्धी कार्यक्रमावेळी प्रियांकाने एकदा पांढऱ्या रंगाचा पॅन्ट सूट घातला होता.
-
प्रियांकाची दिलखेचक अदा
Happy birthday Priyanka Chopra: देसी गर्लचे सर्वोत्कृष्ट ‘कॅज्युअल लूक्स’
Web Title: Happy birthday priyanka chopra the baywatch stars 10 best casual looks of