-
'युके विकली इस्टर्न आय'नं २०१८ मधल्या आशियातील सर्वांत मादक अभिनेत्रींची यादी नुकतीच जाहीर केली. या यादीत सर्वाधिक भारतीय अभिनेत्रींचा समावेश असून छोट्या पडद्यावरील काही अभिनेत्रींनी मोठ्या पडद्यावरील सेलिब्रिटींनाही मागे टाकलं आहे.
-
निया शर्मा- दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांच्यानंतर टेलिव्हिजन अभिनेत्री या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. 'जमाई राजा', 'एक हजारों मे मेरी बहना है' यांसारख्या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
-
शिवांगी जोशी- 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री शिवांगी जोशी या यादीत पाचव्या स्थानावर आहे.
-
हिना खान- कतरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिस, ऐश्वर्या राय बच्चन यांसारख्या अभिनेत्रींना मागे टाकत छोट्या पडद्यावरची अभिनेत्री हिना खान हिनं या यादीत आठवं स्थान मिळवलं आहे.
-
निती टेलर- 'कैसी ये यारियाँ' या मालिकेतील भूमिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री निती टेलर दहाव्या स्थानावर आहे.
-
हेली शाह- स्टार प्लस वाहिनीवरील 'गुलाल' या मालिकेतून करिअरची सुरुवात करणाऱ्या हेलीने अकरावं स्थान पटकावलं आहे.
-
दृष्टी धामी- 'गीत', 'मधुबाला', 'दिल मिल गए' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेली दृष्टी बाराव्या स्थानावर आहे.
-
जेनिफर विंगेट- 'दिल मिल गए', 'बेपनाह' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारणारी जेनिफर तेराव्या स्थानावर आहे.
-
एरिका फर्नांडिस- 'कसौटी जिंदगी की २' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी एरिका पंधराव्या स्थानावर आहे.
-
सुरभी चंद्रा- 'इश्कबाज' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सुरभीने सोळावं स्थान मिळवलं आहे.
‘Sexiest Asian Women’: या टीव्ही अभिनेत्रींनी मोठमोठ्या सेलिब्रिटींनाही टाकलं मागे
‘युके विकली इस्टर्न आय’नं २०१८ मधल्या आशियातील सर्वांत मादक अभिनेत्रींची यादी नुकतीच जाहीर केली.
Web Title: Sexiest asian women 2018 these television actresses mark their place in the list