• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • Subscribe at Rs 699
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. a list of most awaited bollywood films in 2020 scsg

Bollywood Films in 2020: पुढील वर्षी आवर्जून पहावेत असे ११ दमदार चित्रपट

२०२० मध्ये प्रदर्शित होणाऱ्या काही खास चित्रपटांबद्दल

December 16, 2019 12:32 IST
Follow Us
  • यंदाचे वर्ष म्हणजेच २०१९ साली बॉलिवूडमध्ये अनेक बडे चित्रपट प्रदर्शित झाले. यामध्ये अगदी गली बॉय, उरी: द सर्जिकल स्ट्राइक, मिशन मंगल, बाटवला हाऊस असे भन्नाट चित्रपट प्रदर्शित झाले. तर दुसरीकडे मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांची यादी सांगायची झाल्यास हाऊसफूल ४, छिछोरे, बाला, ड्रीम गर्ल असे चित्रपट प्रदर्शित झाले. त्याशिवाय मरजावान, वॉर आणि लवकरच प्रदर्शित होणारा दबंग ३ हा अॅक्शनचा तकडा देणारी चित्रपटही याच वर्षातील आहेत. एकीकडे हे साचेबद्धल चित्रपट प्रदर्शित झाले असतानाच दुसरीकडे कबीर सिंग, पती पत्नी और वो सारखे वेगळ्या विषयावरील चित्रपटही यंदाच्या वर्षी मोठ्या पडद्यावर आले.
    1/13

    यंदाचे वर्ष म्हणजेच २०१९ साली बॉलिवूडमध्ये अनेक बडे चित्रपट प्रदर्शित झाले. यामध्ये अगदी गली बॉय, उरी: द सर्जिकल स्ट्राइक, मिशन मंगल, बाटवला हाऊस असे भन्नाट चित्रपट प्रदर्शित झाले. तर दुसरीकडे मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांची यादी सांगायची झाल्यास हाऊसफूल ४, छिछोरे, बाला, ड्रीम गर्ल असे चित्रपट प्रदर्शित झाले. त्याशिवाय मरजावान, वॉर आणि लवकरच प्रदर्शित होणारा दबंग ३ हा अॅक्शनचा तकडा देणारी चित्रपटही याच वर्षातील आहेत. एकीकडे हे साचेबद्धल चित्रपट प्रदर्शित झाले असतानाच दुसरीकडे कबीर सिंग, पती पत्नी और वो सारखे वेगळ्या विषयावरील चित्रपटही यंदाच्या वर्षी मोठ्या पडद्यावर आले.

  • 2/13

    २०२० सालीही अनेक चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार आहेत. यामध्ये रिमेक, प्रेरणादायी, रोमॅन्टीक, बायोपीक, अॅक्शनपटांचा समावेश आहे. पुढील वर्षी येणाऱ्या अशाच काही खास चित्रपटांवर टाकलेली नजर…

  • 3/13

    ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’- ‘स्वराज्य’निर्मितीच्या पवित्र कार्यात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाच्या पानांवर या मावळ्यांचं कतृत्त्व सोनेरी अक्षरात कोरलं आहे. या मावळ्यांपैकी एक नाव म्हणजेच तान्हाजी मालुसरे होय. तान्हाजींच्या पराक्रमाची कथा ही चित्रपटाच्या रुपात रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर भव्यदिव्य स्वरुपात पाहायला मिळणार आहे. यामध्ये अजय देवगण तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. तर सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट १० जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 4/13

    ‘छपाक’ – अॅसिड हल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित ‘छपाक’ चित्रपट येणार आहे. मेघना गुलजार या चित्रपटाच्या दिग्दर्शिका असून चित्रपटातील लक्ष्मीच्या भुमिकेत अभिनेत्री दीपिका पादुकोण दिसणार आहे. चित्रपटात अॅसिड हल्ला झालेल्या लक्ष्मीचा जीवन जगण्याचा सकारात्मक दृष्टीकोन दाखवण्यात येणार आहे. तसेच मालती उर्फ दीपिकाला अॅसिड हल्यानंतर करावा लागणारा संघर्ष आणि तिच्यावर ओढावणाऱ्या संकटांवर मात करुन ती अखेर सुखी आयुष्य जगते हे दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 5/13

    ‘लालसिंग चड्ढा’ – बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान २०२० मध्ये आपला ‘लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘लालसिंग चड्ढा’ असे आहे. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटावरुन ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटाचे कथानक तयार करण्यात आले आहे. या चित्रपटात आमिर एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु असून तो पुढील वर्षी नाताळाच्या आसापास प्रदर्शित होणार आहे.

  • 6/13

    ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’- अभिनेत्री जान्हवी कपूरची प्रमुख भूमिका असणारा ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ चित्रपट २०२० साली प्रदर्शित होणार आहे. कारगिल युद्धात गुंजन फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्यदलाकडून भारतीय सैनिकांवर निशाणा साधण्यात येत होता. त्या भागातूनच गुंजन यांनी लढाऊ विमान उडवत सैन्यदलातील जवानांना सुरक्षितरित्या बाहेर काढले होते. त्यामुळे त्यांची ही साहसाची गाथा चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरसह पंकज त्रिपाठी, अंगद बेदी, विनीता कुमार आणि मानव विज हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा करत आहेत. हा चित्रपट १३ मार्च २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 7/13

    ‘सूर्यवंशी’ – दिग्दर्शक रोहित शेट्टी पुन्हा एकदा अॅक्शन सीनचा भरणा असलेला ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सिम्बा’प्रमाणेच हा चित्रपटही पोलिसांवर आधारित असणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षयकुमार आणि अभिनेत्री कतरिना कैफ एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. तब्बल ९ वर्षानंतर कतरिना आणि अक्षय एकत्र काम करणार आहेत. २०२० च्या ईदला रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अक्षय कुमार अभिनित ‘सूर्यवंशी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा निर्माता करण जोहर आहे.

  • 8/13

    ८३ – २५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’८३’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादूकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 9/13

    'आज कल' – २००९ साली प्रदर्शित झालेला ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट ठरला. यामध्ये सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका होती. आता त्याच चित्रपटाच्या सिक्वलमध्ये म्हणजेच 'आज कल' या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन आणि सारा अली खान एकत्र काम करताना दिसणार आहेत. याच वर्षी एप्रिल महिन्यात दिल्लीमध्ये ‘लव्ह आज कल’च्या सीक्वलच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२० मध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं कार्तिक आर्यन आणि सारा अली खान पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. तर २००९ साली आलेल्या ‘लव्ह आज कल’मध्ये सैफसोबत दीपिका पादुकोन मुख्य अभिनेत्रीच्या भुमिकेत झळकली होती.

  • 10/13

    ‘ब्रह्मास्त्र’ – अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणबीर व आलिया पहिल्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहेत. तर या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय हेही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण हिमाचल येथे सुरु आहे.

  • 11/13

    ‘जर्सी’ – ‘कबीर सिंग’ चित्रपटामुळे पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलेला अभिनेता म्हणजे शाहिद कपूर २०२० मध्ये पुन्हा एकदा एका रिमेकमध्ये झळकणार आहे. २०२० मध्ये प्रदर्शित होणारा शाहिदचा ‘जर्सी’ हा एका तेलुग चित्रपटाच्या रिमेक असणार आहे. तेलगु चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे गौथम तिन्नानूरी हेच हिंदी रिमेकचे दिग्दर्शन करणार आहेत. ‘जर्सी’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकची निर्मिती अल्लु अरविंद, अमन गिल आणि दिल राजू करणार आहेत. २८ ऑगस्ट २०२० रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 12/13

    ‘थलाइवी’ – तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित ‘थलाइवी’ हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. ‘थलाइवी’ असं या बायोपिकचं नाव असून अभिनेत्री कंगना रणौत जयललिता यांची भूमिका साकारत आहे. हा बायोपिक तामिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. २६ जून २०२० रोजी हा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 13/13

    ‘कुली नं. १’- १९९५ साली डेव्हिड धवन दिग्दर्शित आणि वाशू भगनानी निर्मित ‘कुली नं. १’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. गोविंदा, करिश्मा कपूर आणि कादर खान यांच्या या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रिमेक २०२० साली प्रदर्शित होणार आहे. ‘कुली नं. १’च्या रिमेकमध्ये गोविंदाची जागा अभिनेता वरुण धवन घेणार आहे. तर करिश्मा कपूरच्या जागी अभिनेत्री सारा अली खान हिची वर्णी लागली आहे. चित्रपटाच्या रिमेकची निर्मिती वरुणचा भाऊ रोहित धवन करणार असून दिग्दर्शन डेव्हिड धवन करणार असल्याचे समजते. हा चित्रपट १ मे २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: A list of most awaited bollywood films in 2020 scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.