
कलंक – धर्मा प्रोडक्शनचा कलंक हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याची प्रचंड चर्चा रंगली होती. मात्र ज्यावेळी तो प्रदर्शित झाला त्यावेळी प्रेक्षकांचा हिरमोड झाला. आलिया भट्ट, वरुण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर अशी मोठी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. या चित्रपटाचं बजेट १५० कोटींचं होतं. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १४५.६२ कोटींची कमाई करु शकला. स्टुडंट ऑफ द इयर २ – २०१२ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'स्टुडंट ऑफ द इयर' हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. हा चित्रपट त्यावेळी प्रचंड लोकप्रिय ठरला.त्यामुळेच या चित्रपटाचा सिक्वल करण्याचा निर्णय करण जोहरने घेतला. या चित्रपटाच्या सिक्वलमधून तारा सुतारिया, अनन्या पांडे आणि टायगर श्रॉफ हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई करु शकला. या चित्रपटाने ९७.८१ (सत्त्यानो) कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओ आणि धर्मा प्रोडक्शनने केली आहे. जंगली- अभिनेता विद्युत जामवालची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. सुरुवातीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरेल असं वाटत होतं. मात्र प्रत्यक्षात तो अपयशी ठरला. या चित्रपटात विद्युत जामवालसोबत अक्षय ओबेरॉय,आशा भट, पूजा सावंत, अतुल कुलकर्णी यांनी स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटाचं २२ कोटी रुपयांचं बजेट होतं. सांड की आंख – जगातील सर्वांत वृद्ध महिला शार्पशूटर्सच्या जीवनावर आधारित ‘सांड की आँख’ हा चित्रपट चाहत्यांमध्ये विशेष चर्चेला गेला होता. तापसी पन्नू आणि भूमि पेडणेकर यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. खरं तर या चित्रपटामध्ये अनावश्यक सीनचा भरणा करण्यात आला आहे. त्यामुळे ठराविक काळानंतर तो कंटाळवाणा होतो. अनुराग कश्यप निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केलं आहे. या चित्रपटाने केवळ ३०.३६ कोटींची कमाई केली. द स्काय इज पिंक – देसी गर्ल ते क्वांटिको गर्ल असा प्रवास करणारी प्रियांका बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी उत्तम कथानक असलेल्या चित्रपटाच्या प्रतिक्षेत होती. जवळपास तीन वर्ष प्रतीक्षा केल्यानंतर तिने 'द स्काय इज पिंक' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्षात हा चित्रपट फारसा चालला नाही. उत्तम कथानक असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली. प्रियांका चोप्रा, जायरा वसीम आणि फरहान अख्तर ही तगडी स्टारकास्ट असतानासुद्धा या चित्रपटाने केवळ ३४.४१ कोटींची कमाई केली. नोटबूक- बॉलिवूडमध्ये दिवसागणित रोज नवनवीन चेहरे पाहायला मिळतात. यात काही यशस्वी ठरतात तर काहींच्या पदरात अपयश येतं. असंच काहीसं या चित्रपटाच्या बाबतीत झालं. या चित्रपटातून प्रनुतन बहल आणि झहीर इक्बाल या दोन नवोदित कलाकारांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. खरंतर ज्येष्ठ अभिनेत्री नुतन यांची नात प्रनुतन या चित्रपटातून पदार्पण करत असल्यामुळे साऱ्यांचं लक्ष या चित्रपटाकडे वेधलं होतं. मात्र तिच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर चालली नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला.
Flashback 2019 : वर्षभरात ‘हे’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले
‘कलंक’ प्रदर्शित होण्यापूर्वी त्याची प्रचंड चर्चा रंगली होती
Web Title: Flashback 2019 this movies are flop in 2019 ssj