Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. flash back 2019 hit movies of bollywood avb

flashback 2019 : ‘हे’ बॉलिवूड चित्रपट ठरले हिट

चला पाहूया ह चित्रपट कोणते आहेत

December 18, 2019 18:44 IST
Follow Us
  • बघता बघता २०१९ हे वर्ष संपत आले आहे. या वर्षात बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली तर काही फ्लॉप ठरले. अनेक चित्रपटांनी अपेक्षा पेक्षा जास्त कमाई केली तर काही बिग बजेट चित्रपटांनी प्रेक्षकांचा हिरमोड झाला. पण काही असे देखील चित्रपट आहेत ज्यांनी हॉलिवूड चित्रपटांनाही मागे टाकले. आज आपण जाणून घेणार आहेत २०१९ मध्ये हिट ठरलेले काही चित्रपट...
    1/11

    बघता बघता २०१९ हे वर्ष संपत आले आहे. या वर्षात बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली तर काही फ्लॉप ठरले. अनेक चित्रपटांनी अपेक्षा पेक्षा जास्त कमाई केली तर काही बिग बजेट चित्रपटांनी प्रेक्षकांचा हिरमोड झाला. पण काही असे देखील चित्रपट आहेत ज्यांनी हॉलिवूड चित्रपटांनाही मागे टाकले. आज आपण जाणून घेणार आहेत २०१९ मध्ये हिट ठरलेले काही चित्रपट…

  • 2/11

    या यादीमधील सर्वात पहिला चित्रपट म्हणजे वॉर. बॉलिवूडचा हॅण्डसम हंक हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांची उत्तम केमिस्ट्री असलेला ‘वॉर’ हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

  • 3/11

    या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच या दोन अभिनेत्यांनी स्क्रिन शेअर केली होती. चित्रपटात साहसीदृश्यांचा भडीमार करण्यात आला असून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींहून अधिक कमाई केली.

  • 4/11

    बॉलिवूडमध्ये आजवर आपण बऱ्याच प्रेमकथा पाहिल्या आहेत. प्रेमासाठी वेडे होणारे प्रियकसुद्धा पाहिले आहेत. दिग्दर्शक संदीप वांगा यांचा 'कबीर सिंग' मात्र या सर्वांपेक्षा वेगळा आहे.

  • 5/11

    तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हा हिंदी रिमेक आहे. शाहिद कपूर व कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला ‘कबीर सिंग’ थोडी हटके प्रेमकहाणी सांगतो. या चित्रपटाने ३५० कोटींहून अधिक कमाई केली.

  • 6/11

    ‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है. ये घर मै घुसेगा भी और मारेगा भी’, असं म्हणणाऱ्या भारताच्या सूडाची कहाणी म्हणजेच ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपट होय. जम्मू- काश्मीरमधल्या उरी येथील मुख्यालयावर १८ सप्टेंबर २०१६ मध्ये पहाटेच्या सुमारास चार दहशतवाद्यांनी हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात १९ भारतीय जवान शहीद झाले. पण, या हल्ल्यानंतर गप्प न बसता भारतानं शहीद झालेल्या जवानांचा कसा सूड घेतला याची शौर्यगाथा म्हणजेच ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक.’

  • 7/11

    या चित्रपटात अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिकेत असून परेश रावल, मोहित रैना, किर्ती कुल्हारी, यामी गौतम यांनी भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३४० कोटींहून अधिक गल्ला जमवला.

  • 8/11

    या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच सलमानची पाच वेगवेगळी रुप प्रेक्षकांना पाहता आली. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचं मन जिंकण्यास यशस्वी ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३१० कोटींहून अधिक कमाई केली.

  • 9/11

    बॉलिवूड दबंग खान सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा 'भारत' हा चित्रपट (५ जून) ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

  • 10/11

    हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. तसेच विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी, कृति कुल्हारी हे कलाकार झळकले होते. या चित्रपटाने २८० कोटींहून अधिक गल्ला कमावला होता

  • 11/11

    मिशन मंगल हा चित्रपट मंगळयान मोहिमेतील प्रमुख वैज्ञानिक राकेश धवन आणि त्यांचे सहकारी तारा शिंदे, एका गांधी, कृतिका अग्रवाल, वर्षां गावडा, नेहा सिद्दीकी, परमेश्वर नायडू, अनंत आयर आदी वैज्ञानिकांना हा चित्रपट म्हणजे एक मानवंदना आहे.

Web Title: Flash back 2019 hit movies of bollywood avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.