
अभिनेत्री प्रियांका चोप्राने २०१८ मध्ये अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला आता जवळपास एक वर्ष उलटली आहेत. मात्र तरीदेखील त्यांच्या लग्नाची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगते. जोधपूरमधील उमेद भवन येथे शाही पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. भारतीय आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने हा सोहळा रंगला होता. अगदी मेहंदीपासून ते सप्तपदीपर्यंत प्रत्येक सोहळा खास करण्यासाठी प्रियांकाने विशेष लक्ष दिलं होतं. खरं तर प्रियांकाला भारतात लग्न करण्याची इच्छा नव्हती. तिला डेस्टिनेशन वेडिंग करायचं होतं. निकच्या आग्रहाखातर तिने भारतात लग्न केलं. परंतु हा विवाहसोहळा दैदिप्यमान होण्यासाठी तिने जोधपूरमधील उमेद भवनची निवड केली. प्रियांका-निकचं लग्न खास करण्यासाठी उमेदभवनमध्ये विशेष तयारी करण्यात आली होती. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यासाठी प्रियांकाने नेमका किती खर्च केला होता. ते नुकतंच समोर आलं आहे. प्रियांका व निकच्या लग्नासाठी संपूर्ण उमेद भवन चार दिवसांसाठी बुक करण्यात आलं होतं. या काळात बाहेरील व्यक्तीस उमेद भवनात येण्यास मनाई होती. या चार दिवसामध्ये प्रियांकाने जवळपास सव्वा तीन कोटी रुपयांचा खर्च केला विशेष म्हणजे या लग्नात प्रियांकाने जो खर्च केला त्या खर्चामध्ये उमेद भवनाची तीन महिन्यांची कमाई वसूल केल्याचं सांगण्यात येत आहे. २०१८ मध्ये निक -प्रियांकाचं लग्न सर्वाधिक चर्चेत राहिलं होतं. त्यामुळे त्यांच्या संगीत सोहळ्यावर आधारित एक वेबसीरिज तयार करण्यात येणार आहे. २०२० मध्ये ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं अलिकडेच प्रियांकाने एका कार्यक्रमात सांगितलं. -
प्रियांका-निकच्या लग्नामुळे ‘उमेद भवन’ झाले ‘मालामाल’, तीन दिवसांत कमावले तब्बल…
प्रियांका-निकच्या लग्नात केला इतक्या कोटींचा खर्च
Web Title: Priyanka chopra nick jonas grand wedding provided umaid bhawan palace with 3 months worth of revenue ssj