• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. from earning rs 50 a day to owning a bmw here is the story of indian tiktok star faisal shaikh ssv

दिवसाला फक्त ५० रुपये कमाई ते BMW चा मालक; TikTok स्टार फैजलचा थक्क करणारा प्रवास

एका सामान्य परफ्युमच्या दुकानातून कामावरून हाकलून दिलेला फैजल आता एका डिओडरंट ब्रँडचा मालक आहे.

March 19, 2020 14:26 IST
Follow Us
    • सोशल मीडियामुळे तुम्ही सेलिब्रिटी होऊ शकता असं कोणी म्हटलं तर तुमचा सहज विश्वास बसणार नाही. पण फैजल शेखने हे सिद्ध करून दाखवलंय.
    • मि. फैजू नावाने ओळखला जाणारा फैजल शेख हा टिकटॉक स्टार आहे.
    • TikTok या लोकप्रिय अॅपवरील त्याच्या गमतीशीर व्हिडीओ क्लिप्स व लिप-सिंक व्हिडीओचे देशभरात लाखो चाहते आहेत.
    • दर दिवसा फक्त ५० रुपये कमावणाऱ्या फैजलकडे आज BMW गाडी आहे आणि मॉडेलिंगचे मोठमोठे प्रोजेक्ट्सुद्धा. हे सर्व शक्य झालंय सोशल मीडियामुळे.
    • सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित फैजलने त्याचा हा प्रवास उलगडला.
    • वडिलांना त्यांच्या छोट्या व्यवसायात मदत करत मी लहानाचा मोठा झालो. काम खूप होतं पण पैसा कमी मिळायचा. त्यामुळे वयाच्या २१व्या वर्षी मी लिंकिंग रोडवर कपडे विक्रीचं काम करू लागलो. तेव्हा दिवसाला मला ५० रुपये मिळायचे, असं त्याने लिहिलं होतं.
    • दिवसाचे नऊ-दहा तास तो उन्हातान्हात कपडे विकण्याचे काम करायचा.
    • काम करत तो कॉलेजचं शिक्षण पूर्ण करत होता. सकाळी सहा वाजता उठून कॉलेजला जायचा आणि नंतर कपडे विक्रीचं काम करून रात्री १२ वाजता घरी पोहोचायचा.
    • आईवडिलांच्या आजारपणात त्यांना औषध आणण्यासाठीही पैसे नसायचे, असं त्याने सांगितलं.
    • एका परफ्युम विक्रीच्या दुकानात काम करताना हातातून परफ्युमची बॉटल पडल्याने त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं.
    • जगण्याचा हा संघर्ष सुरु असताना फैजल सोशल मीडियावर स्वत:चे व्हिडीओ पोस्ट लागला. दर दिवसाला १४ व्हिडीओ तो पोस्ट करायचा. कामाला जाताना, लंचब्रेकमध्ये आणि आजारी असतानाही त्याने वर्षभर हे व्हिडीओ पोस्ट केले.
    • हळूहळू लोक त्याला ओळखू लागले. पण त्याच्या आईवडिलांना हे मंजूर नव्हतं. 'लडका बरबाद हो गया' असं त्याचे नातेवाईक म्हणायचे.
    • त्याच्या एका व्हिडीओला दोन दिवसांत १ कोटी व्ह्यूज मिळाले. तेव्हा खरी सुरुवात झाली. विविध कार्यक्रमांना त्याला बोलावलं जाऊ लागलं. लोक त्याच्यासोबत सेल्फी काढू लागले.
    • आता फैजल मॉडेलिंगसुद्धा करतो. इन्स्टाग्रामवर त्याचे तब्बल १ कोटी ८० लाख फॉलोअर्स आहेत.
    • त्याला म्युझिक व्हिडीओची ऑफर मिळाली आणि त्या व्हिडीओला तब्बल १० कोटी व्ह्यूज मिळाले. या प्रसिद्धीनंतर फैजलने स्वत:चा डिओडरंटचा ब्रँड चाहत्यांचा भेटीला आणला.
    • फैजलच्या डिओडरंट ब्रँडला इन्स्टाग्रामवर दोन तासांत तब्बल पाच हजार ऑर्डर्स आले होते.
    • फैजलने नुकतंच त्याच्या बहिणीचं लग्न धूमधडाक्यात केलं. आता तो नवीन घरसुद्धा विकत घेत आहे. प्रसिद्धीच्या एका वर्षात फैजलने BMW खरेदी केली.
    • एका सामान्य परफ्युमच्या दुकानातून कामावरून हाकलून दिलेला फैजल आता एका डिओडरंट ब्रँडचा मालक आहे.

Web Title: From earning rs 50 a day to owning a bmw here is the story of indian tiktok star faisal shaikh ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.