• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. south superstars came support someone gave amount crores someone made hospital home ssj

Coronavirus : हिरो नाही तर सुपरहिरो; करोना विषाणूशी लढण्यासाठी केली कोट्यवधींची मदत

जाणून घ्या, कोणत्या कलाकाराने किती कोटींची मदत केली

March 28, 2020 11:27 IST
Follow Us
  • करोना विषाणूशी लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला आहे. प्रत्येक जण या महामारीपासून वाचण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहेत. सरकारदेखील विविध योजनांची अंमलबजावणी करत असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करत आहे. यामध्येच काही सामाजिक संस्था आणि सेलिब्रिटींनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. विशेष म्हणजे ही मदत करण्यात दाक्षिणात्य कलाकार अग्रेसर असल्याचं पाहायला मिळतंय. (सौजन्य : सर्व फोटो जनसत्ता/ इंडियन एक्स्प्रेस)
    1/15

    करोना विषाणूशी लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला आहे. प्रत्येक जण या महामारीपासून वाचण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहेत. सरकारदेखील विविध योजनांची अंमलबजावणी करत असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करत आहे. यामध्येच काही सामाजिक संस्था आणि सेलिब्रिटींनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. विशेष म्हणजे ही मदत करण्यात दाक्षिणात्य कलाकार अग्रेसर असल्याचं पाहायला मिळतंय. (सौजन्य : सर्व फोटो जनसत्ता/ इंडियन एक्स्प्रेस)

  • पवन कल्याण – दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याणने करोना विषाणूशी लढा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
  • 2/15

    पवनने मदतनिधीच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

  • 3/15

    महेश बाबू

  • 4/15

    महेश बाबूने एक कोटी रुपयांची मदत केली आहे.

  • राम चरण तेजा – लोकप्रिय अभिनेता चिरंजीवी याच्याप्रमाणेच त्याचा मुलगा राम चरण तेजादेखील अभिनेता असून त्याने गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
  • 5/15

    राम चरण तेजाने ७० लाख रुपये आर्थिक मदत म्हणून दिले आहेत.

  • चिरंजीवी – चिरंजीवी हा दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. जगावर ओढावलेल्या महामारीमध्ये देशातील नागरिकांसाठी त्याने आर्थिक मदत केली आहे.
  • 6/15

    त्याने १ कोटी रुपये आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे.

  • रजनीकांत- सुपरस्टार रजनीकांतनेदेखील गरजूंसाठी मदत करण्याचा निर्धार केला आहे.
  • 7/15

    त्याने तामिळ चित्रपटसृष्टीतील मातृ संस्था फिल्म एम्पॉइज फेडरेशन ऑफ साउथ इंडियाला ५० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

  • कमल हासन- कमल हासन यांनी आर्थिक मदत करण्यापेक्षा एका वेगळ्या मार्गाने गरजूंची मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.
  • 8/15

    कमल हासनने चक्क त्याच्या घरालाच रुग्णालय करण्याचा निर्णय घेतला आहे. वेळ पडली तर माझ्या घराचा रुग्णालय म्हणून वापर करा असं त्याने जाहीर केलं आहे.

  • प्रभास – बाहुबलीफेम प्रभासने एकून चार कोटींची मदत केली आहे. मात्र ही रक्कम त्याने वेगवेगळ्या पद्धतीने विभागली आहे.
  • प्रभासने ४ कोटी रुपयांपैकी ३ कोटी रुपये पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीच्या माध्यमातून दिले आहेत. तर उर्वरित ५०-५० लाख रुपये अनुक्रमे आंध्र प्रदेश आणि तेलंगना राज्याच्या मुख्यमंत्री मदतनिधीसाठी दिले आहेत.
TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: South superstars came support someone gave amount crores someone made hospital home ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.