बॉलिवूड आणि हॉलिवूडप्रमाणेच अनेक वेळा पॉर्न इंडस्ट्रीची देखील बऱ्याच वेळा चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं. पॉर्न इंडस्ट्रीमध्ये एकेकाळी आपल्या नावाचं वर्चस्व गाजवलेल्या काही पॉर्नस्टारने या क्षेत्राला रामराम केला आहे. सनी लिओनीप्रमाणेच या क्षेत्रातील अशा १० पॉर्नस्टार आहेत, ज्यांनी या क्षेत्रातून काढता पाय घेत आपल्या करिअरच्या नव्या वाटा शोधल्या आहेत. ( सौजन्य : सोशल मीडिया) ब्री ऑल्सन- २००६ ते २०११ या कलावधीत ब्री ऑल्सनने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम केलं. या कालावधीत तिने जवळपास २८१ पॉर्नपटात काम केल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर ब्रीने या क्षेत्रातून काढता पाय घेत ती हॉलिवूडपटांकडे वळाली. तिने सेंटीपीड 3 सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एशिया करेरा – या क्षेत्रात आलेल्या अशा अनेक पॉर्नस्टार आहेत, ज्यांना या क्षेत्रातून बाहेर पडून एक सर्व सामान्य आयुष्य जगण्यास पसंती दिली. त्यातलंच एक नाव म्हणजे एशिया करेरा. २००३ एशियाने पॉर्न इंडस्ट्री सोडून दिली आणि तिने लग्न केलं. विशेष म्हणजे एशिया एक गृहिणी असून तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत राहते. ग्रिझेल लिऑन – ग्रिझेल लिऑन ही पॉर्न इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय पॉर्नस्टार होती असं म्हटलं जातं. सर्वसामान्य पद्धतीने आयुष्य जगता यावं यासाठी ग्रिझेलने पॉर्न इंडस्ट्रीमधून बाहेर पडली. सध्या ती रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करत आहे. ह्युस्टन – २०१२ मध्ये ह्युस्टनने पॉर्न इंडस्ट्री सोडून दिली. एका मासिकात तिच्यावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर तिने या क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या क्षेत्रातून बाहेर पडल्यानंतर तिने या इंडस्ट्रीमधील अनेक गोष्टींचा खुलासा केला. लीसा एन- लीसाने जवळपास ५०० पॉर्नपटांमध्ये काम केलं होतं. मात्र २०१४ मध्ये तिने या क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मिया खलिफा- २०१५ मध्ये पॉर्न इंडस्ट्री सोडणारी मिया खलिफा हे नाव अनेकांच्या परिचयाचं आहे. तिने केवळ ३ महिने या क्षेत्रात काम केलं, मात्र त्यानंतर तिने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मिया खलिफा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर अॅक्टीव्ह असून तिचा मोठा फॅनफॉलोअर्स आहे. (सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस) रेलिन- रेलिनने २००१ मध्ये स्वत:वरील पॉर्नस्टार हा टॅग हटवत तिने नव्याने करिअरची सुरुवात केली. तिने एक रिअल इस्टेट कंपनी सुरु केली होती. मात्र येथे अनेक हालअपेष्टा सहन केल्यानंतर तिने पुन्हा पॉर्न पटांची वाट धरली. परंतु, काही वर्षांमध्येच तिने पुन्हा एकदा या क्षेत्राला रामराम केला. साशा ग्रे – पॉर्न इंडस्ट्रीमधील लोकप्रिय ठरलेल्या साशाने या क्षेत्रातून बाहेर पडत छोट्या पडद्याची वाट धरली.द गर्लफ्रेंड एक्सपिरीअन्समध्ये ती काम केलं होतं. तसंच तिने एका हॉररपटातही काम केलं आहे. स्कीन डायमंड – गायन, अभिनय आणि लेखन या क्षेत्रात रस असल्यामुळे स्कीन पॉर्न इंडस्ट्रीकडे वळली. मात्र त्यानंतर ती यातून बाहेर पडत स्वत:चा म्युझिक प्रोजेक्ट लॉंच केला. सनी लिओनी- पॉर्नपटांना अलविदा करुन सनी लिओनीने तिचा मोर्चा बॉलिवूड चित्रपटांकडे वळविला आहे. त्यामुळे सनी लिओनी हे नाव बॉलिवूडच्यादेखील परिचयाचं झालं आहे. सनीने पॉर्नपटांना रामराम केल्यानंतर ती तिच्या पती आणि तीन मुलांसोबत राहत आहे.
पॉर्न इंडस्ट्रीला अलविदा केलेल्या ‘या’ दहा पॉर्नस्टार्स
Web Title: Famous adult film stars who left the industry to lead an ordinary life ssj