• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pooja batra married to nawab shahs love story dmp

PHOTOS …आणि विरासत फेम पूजा बात्राने नवाब शाहबरोबर केलं दुसरं लग्न

Updated: September 10, 2021 14:26 IST
Follow Us
  • दीपिका पदुकोण-रणवीर सिंग, प्रियांक चोप्रा-निक जोन्स यांच्या लग्नाला मीडियामध्ये खूप प्रसिद्धी मिळाली. पण काही लग्न गुपचूपपणे साध्या पद्धतीने केली जातात. पूजा बात्रा आणि नवाब शाह यांचे लग्न सुद्धा असेच साध्या पद्धतीन झाले होते. ( फोटो सौजन्य - पूजा बात्रा इन्स्टाग्राम)
    1/10

    दीपिका पदुकोण-रणवीर सिंग, प्रियांक चोप्रा-निक जोन्स यांच्या लग्नाला मीडियामध्ये खूप प्रसिद्धी मिळाली. पण काही लग्न गुपचूपपणे साध्या पद्धतीने केली जातात. पूजा बात्रा आणि नवाब शाह यांचे लग्न सुद्धा असेच साध्या पद्धतीन झाले होते. ( फोटो सौजन्य – पूजा बात्रा इन्स्टाग्राम)

  • 2/10

    लग्नाची घोषणा करण्याच्या काही दिवस आधी नवाबने पत्नी पूजा बात्रासोबत एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये विवाहित स्त्रीच्या हातात लाल बांगडया असतात तशाच बांगडया पूजाच्या हातामध्ये होत्या.

  • 3/10

    पूजा बात्राचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी अमेरिकास्थित सर्जन सोनू अहलुवालिया बरोबर तिचे लग्न झाले होते. पूजा बात्रा बरोबर लग्न करण्याआधी नवाब शाहचे कविता कौशिक बरोबर नाव जोडले जात होते. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

  • 4/10

    पूजाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन लग्नाची घोषणा केली. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने नवाब बरोबर कशी ओळख झाली. इतक्यावर्षांनी लग्न करण्याचा निर्णय कसा घेतला त्याबद्दल माहिती दिली.

  • 5/10

    "हो, दिल्लामध्ये आमचे लग्न झाले. लग्नाला फक्त आमचे कुटुंबीय उपस्थित होते. आमचे जवळते नातलग आम्ही लग्नला उशीर का करतोय? असे आम्हाला विचारायचे. नवाब हा तोच माणूस आहे ज्याच्याबरोबर मला संपूर्ण आयुष्य काढायचेय हे लक्षात आल्यानंतर लग्नाला उशीर करण्यात अर्थ नव्हता. तेव्हा आम्ही लग्न केले" असे पूजाने मुलाखतीत सांगितले.

  • 6/10

    "एकाच व्यवसायात असल्यामुळे मी नवाबबद्दल ऐकून होते. पण मागच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात एका कॉमन मित्राच्या माध्यमातून आमची ओळख झाली. आयुष्याच्या एका योग्य वळणावर आम्ही एकत्र आलोय असे मला वाटते" असे पूजाने सांगितले.

  • 7/10

    "नवाब मला आवडतोही आणि त्याचा आदरही करते. आम्ही भावनिक आणि विचाराने एकत्र आलो. आम्हाला दोघांनाही परस्परांना सगळं समजावून सांगण्याची गरज लागत नाही. तो कुटुंबवत्सल आहे हा गुण मला त्याचा आवडतो" असे पूजाने सांगितले.

  • 8/10

    सरफरोश, लक्ष्य, टायगर जिंदा है, पानिपत अशा नावाजलेल्या चित्रपटांमध्ये नवाब शाहने काम केले आहे.

  • 9/10

    विरासत, भाई, शाम-घनशाम, साजिश अशा अनेक चित्रपटांमध्ये पूजाने काम केले आहे. पण विरासतमधील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

  • 10/10

    मिरर गेम या चित्रपटात पूजाने शेवटचे काम केले आहे. आता भारतातही जास्तीत जास्त काम करण्याचा तिचा प्रयत्न आहे. अमेरिकन शो मध्येही पूजाने काम केले आहे.

Web Title: Pooja batra married to nawab shahs love story dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.