सावळा रंग उजळण्यासाठी हे उपाय करा, ते उपाय करा असं अनेकजण सांगताना दिसतात. पण सावळ्या रंगाचा स्वीकार करा असे सांगणारे फार कमी असतात. याच वर्णभेदाला छेद देणारं फोटोशूट अभिनेत्री स्मिता गोंदकरने केलं आहे. चेहऱ्याचा रंग गोरा करण्यासाठी विविध मेकअप करून ग्लॅमरस फोटोशूट अनेक अभिनेत्री करतात. पण याउलट स्मिताने सावळ्या रंगात फोटोशूट केलं आहे. स्वत:च्या रंगावर प्रेम करा व त्याचा स्वीकार करा असा संदेश तिने या फोटोशूटमधून दिला आहे. या फोटोंसोबतच तिने एक पोस्ट लिहिली आहे. "मी जेव्हा अमेरिकेहून परतले, तेव्हा मी सावळ्या रंगाविषयी मला विशेष प्रेम वाटू लागलं होतं. मी सन बाथिंगचे अनेक प्रयोग करून पाहिले होते. मात्र त्यावेळी त्वचेच्या सुरक्षिततेची काळजी न घेतल्याने माझी त्वचा खराब झाली. त्या प्रयोगांनंतर माझी त्वचा संवेदनशील झाली आहे. आता पुन्हा मी मोकळेपणाने ते प्रयोग करू शकेन की नाही माहीत नाही. म्हणूनच सर्व प्रकारच्या वर्णाबद्दल असलेलं माझं प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी मी हे फोटोशूट केलं आहे." सावळा रंग खरंच सुंदर असतो आणि माझ्या या फोटोशूटमधून मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे, असं तिने लिहिलं. "त्वचेचा रंग कुठलाही असो, असे अनेक यशस्वी लोक आहेत, ज्यांनी इतरांसमोर उदाहरण सादर केलं आहे. ज्यांनी आयुष्यात भरपूर यश संपादन केलं आहे. त्यामुळे कोणताही दुसरा रंग मिळवण्याचा प्रयत्न न करता आहे त्या रंगासोबत खूश राहुया," असा सकारात्मक संदेश स्मिताने दिला आहे. -
रंगामुळे तुमचं अस्तित्व किंवा तुम्ही कोण आहात हे सिद्ध होत नाही, असं म्हणत तिने प्रेरणादायी पोस्ट शेअर केली आहे.
-
"सौंदर्याला कुठलाही रंग नसतो."
-
फेअर अँड लव्हली या कंपनीने त्यांच्या नावातून 'फेअर' हा शब्द काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्मिताने केलेलं हे फोटोशूट विशेष लक्ष वेधून घेत आहे.
-
'रंग माझा वेगळा'
सर्व छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ स्मिता गोंदकर
रंग तुझा सावळा दे मला! वर्णभेदाला छेद देणारं स्मिता गोंदकरचं फोटोशूट
Web Title: Smita gondkar brown is beautiful photoshoot ssv