-
बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत असतात तर कधी त्यांच्या लग्नामुळे. त्यांच्या लग्नाचा आलिशान थाट हा पाहण्यासारखा असतो. पण अभिनेत्री त्यांच्या लग्नातील ड्रेससाठी किती पैसे खर्च करतात हे तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊया… (All Photos : Social Media)
-
बॉलिवूडची ब्यूटी क्वीन अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या वेडिंग ड्रेसची किंमत ७५ लाख रुपये असल्याचे म्हटले जाते.
-
अभिनेत्री करिना कपूरने तिच्या लग्नात ५० लाख रुपयांचा ड्रेस परिधान केला असल्याचे म्हटले जात आहे.
-
सर्वांची लाडकी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या लग्नात ५० लाख रुपयांचा वेडिंग ड्रेस परिधान केला असल्याच्या चर्चा सुरु होत्या.
-
अभिनेत्री अनुष्का शर्माच्या वेडिंग ड्रेसची किंमत ४५ लाख रुपये असल्याचे म्हटले जाते.
-
अभिनेत्री जेनेलिया डिसुजाने लग्नात परिधान केलेल्या ड्रेसची किंमत १७ लाख रुपये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या लग्नातील लेहेंगा हा बॉलिवूड ड्रेस डिझायनर सब्यसाचीकडून डिझाइन करुन घेतला होता. तिच्या या वेडिंग ड्रेसची किंमत जवळपास १८ लाख रुपये असल्याचे म्हटले जाते.
-
अभिनेत्री दीपिका पदुकोणने इटलीमध्ये मोठ्या थाटात लग्न केले. तिच्या वेडिंग ड्रेसची किंमत १२ लाख रुपये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
अभिनेत्री बिपाशाना बासूच्या वेडिंग ड्रेसची किंमत ४ लाख रुपये असल्याचे म्हटले जाते.
-
तसेच उर्मिला मातोंडकरने तिच्या लग्नात ४.५० लाख रुपयांचा ड्रेस परिधान केला होता.
ऐश्वर्या राय ते शिल्पा शेट्टी, जाणून घ्या अभिनेत्रींच्या वेडिंग ड्रेसची किंमत
पाहा फोटो
Web Title: Shilpa shetty to aishwarya rai know about price of their wedding dress avb