छोट्या पडद्यावरील 'ये हैं मोहब्बते' या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हे नाव आज सर्व परिचित झालं आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेली दिव्यांका अनेक वेळा तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यामध्ये तिने तिच्या घराचेदेखील काही फोटो शेअर केले आहेत. (सौजन्य : दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांच्या इन्स्टाग्राम पेजवरुन) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया या लोकप्रिय जोडीने २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे ऑनस्क्रीन लोकप्रिय असलेली ही जोडी ऑफस्क्रीनदेखील तितकीच लोकप्रिय आहे. चार भिंती म्हणजे घर नसतं. तर तेथे राहणाऱ्या माणसांमुळे त्या घराला घरपण येतं. यात अनेक जणांना घर सजवण्याची फार आवड असते. तशी आवड दिव्यांका आणि विवेकला असल्याचं दिसून येतं. या दोघांनी त्यांच्या स्वप्नांचं घर उत्तमरित्या सजवलं आहे. दिव्यांकाच्या घरातील प्रत्येक कोपरा न् कोपरा अत्यंत विचारपूर्वक आणि सुंदररित्या सजवण्यात आला आहे. सध्या लॉकडाउन असल्यामुळे दिव्यांका आणि विवेक घरी असून ते एकमेकांना वेळ देण्यासोबतच घरकामातही मन रमवत आहेत. दिव्यांका केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर सुगरणही असल्याचं दिसून येतं. या लॉकडाउनच्या काळात ती वेगवेगळ्या रेसिपीज करुन पाहात आहे. बागकामात दिव्यांका आणि विवेक मग्न झाले असून ते झाडांची काळजी घेत आहेत. घरी रहून विवेक त्याच्या कामाकडेदेखील लक्ष देत असल्याचं पाहायला मिळत आहे. दिव्यांका- विवेकच्या घराला जोडून मोठी गच्ची असल्याचं पाहायला मिळतं. संध्याकाळच्या वेळी शांतपणे पुस्तक वाचताना विवेक. दिव्यांकाचं घर प्रचंड मोठं असल्याचं पाहायला मिळतं. लॉकडाउनमुळे सारं काही बंद असल्यामुळे दिव्यांकाने घरी राहूनच विवेकचा हेअर कट केला होता. 'ये है मोहब्बते' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली दिव्यांका अनेक वेळा सोशल मीडियावर व्यक्त होत असते. समाजात घडणाऱ्या अनेक घटनांवर ती व्यक्त होताना दिसते.
सपनों का आशियाना! असं सजलंय दिव्यांका त्रिपाठीचं घर
पाहा, दिव्यांकाने तिचं घरं कसं सजवलं आहे
Web Title: Divyanka tripathi house inside photo ssj