-
महानायक अमिताभ बच्चन यांच्यासंदर्भात नानावटी रुग्णालयाने अमिताभ यांच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती दिली आहे. रुग्णालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार अमिताभ बच्चन यांच्यामध्ये करोनाचा हलकी लक्षणं दिसत असून त्यांना रुग्णालयातील आयसोलेशन युनिटमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे अमिताभ स्वत: ट्विवटवरुन आपल्या आरोग्यासंदर्भात माहिती देत राहतील असं त्यांनी सांगितल्याचे रुग्णालाने स्पष्ट केलं आहे. सीएनबीसीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. अमिताभ मुलगा अभिषेक बच्चन यांना दोघांनाही करोनाची लागण झाल्याचे शनिवारी रात्री उशीरा स्पष्ट झालं. दोघांनाही आपआपल्या ट्विटर हॅण्डलवरुन यासंदर्भातील माहिती दिली. त्यानंतर आज सकाळी अमिताभ यांच्या निवासस्थानी धाव घेत तेथील परिसर सॅनिटाइज केला.
-
अमिताभ आणि अभिषेक यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर आज (रविवारी) सकाळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी अमिताभ बच्चन यांच्या जलसा या निवासस्थानी दाखल झाले.
-
जलसा या बच्चन कुटुंबियांच्या निवासस्थानाजवळ सॅनिटायझेशन आणि फवारणी करण्यासाठी हे कर्मचारी रविवारी सकाळीच येथे दाखल झाल्याचे वृत्त आणि फोट एएनआय या वृत्तसंस्थेने पोस्ट केले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांनी पीपीई कीट घातले आहेत.
-
अमिताभ यांना करोना झाल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या जलसा या निवासस्थानाबाहेर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंची उपस्थिती पहायला मिळत नाहे.
-
जलसाच्या प्रवेशद्वाराजवळ महापालिकेचे सफाई कर्मचारी तसेच सॅनिटायझेशनचे काम करणारे कर्मचारी दिसून आले.
BMC च्या कर्मचाऱ्यांनी हाती घेतलं ‘जलसा’च्या सॅनिटायझेशनचं काम
अमिताभ आणि अभिषेक करोना पॉझिटीव्ह निघाल्यानंतर पालिकेकडून सॅनिटायझेशन
Web Title: Sanitisation workers of the bmc arrive at actor amitabh bachchan home jalsa scsg