कलाविश्वाची जरी ग्लॅमरस बाजू आहे, तशीच त्याची एक काळी बाजूदेखील आहे. जेथे सेलिब्रिटींची लक्झरी लाइफस्टाइल ,जीवनशैली चर्चेत येत असते. तेथेच त्यांच्या व्यसनांचीही चर्चा रंगताना दिसून येते. कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे अमली पदार्थ, ड्रग्स यांच्या आहारी गेल्याचं दिसून आलं आहे. यातील काही सेलिब्रिटींनी या व्यसनांवर मात मिळवल्याचं पाहायला मिळालं. अभिनेता संजय दत्तपासून ते ममता कुलकर्णीपर्यंत अनेक कलाकारांची नावं अमली पदार्थाचं सेवन आणि त्याचे सप्लाय करणे यामध्ये आल्याचं पाहायला मिळालं. खरं तर कलाविश्वातील असे अनेक दिग्गज कलाकार किंवा स्टारकिड आहेत, जे अमली पदार्थाच्या आहारी गेले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात ड्रग्स आणि अमली पदार्थाचे अॅडिक्ट असलेल्या कलाकारांविषयी. १९८२ साली अवैधरित्या ड्रग्स बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला अटक करण्यात आली होती. हे प्रकरण त्याकाळी चांगलंच गाजलं होतं. संजयचा १९८१ साली रॉकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यावेळी तो ड्रग्सच्या अधीन होता हे कलाविश्वातील अनेकांना ठावूक होतं.संजयने अमेरिकेत जाऊन यावर उपचारही केले होते. एकेकाळी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ममता कुलकर्णीकडे पाहिलं जायचं. परंतु, २०१६ मध्ये तिच्याजवळ २ हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ आढळून आले. तिच्यासोबत तिच्या पतीवर विक्की गोस्वामीवरदेखील ड्रग्स तस्करी करत असल्याचे आरोप झाले होते. फरदीन खानचा ‘प्यार तुने क्या किया’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या पाच-सहा दिवसात त्याच्या गाडीत कोकेन सापडले. या प्रकरणी पुढे त्याच्यावर खटला दाखल झाला. परंतु, पुराव्यांअभावी त्याची निर्दोष सुटका झाली. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतिक बब्बर यांचंही अमली पदार्थाच्या सेवनाचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. संजय दत्तप्रमाणेच त्यानेदेखील जाहीरपणे त्याच्या व्यसानविषयी सांगितलं होतं. वयाच्या १३ व्या वर्षीच प्रतिक ड्रग्सच्या आहारी गेला होता. मात्र, कालांतराने व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन त्याने योग्य उपचार केल्यावर यातून बाहेर पडला. अमली पदार्थाच्या आहारी गेल्यामुळे हनी सिंगच्या करिअरचा आलेख झपाट्याने खाली आला होता. सतत व्यसन केल्यामुळे त्याचं कामाकडे दुर्लक्ष झालं होतं. परिणामी, त्याच्या हातातून अनेक काम निसटल्याचं पाहायला मिळालं होतं. एका मुलाखतीत त्याने व्यसनाच्या आहारी जाण्यापासून ते त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडण्यापर्यंत नेमकं त्याच्या आयुष्यात काय काय झालं हे सांगितलं होतं. वयाच्या १६ व्या वर्षी पूजा भट्ट दारुच्या आहारी गेली होती. कालांतराने हे प्रमाण वाढून वयाच्या २३ व्या वर्षी तिला दारुसोबतच सिगरेटचंही व्यसन लागलं. मात्र काही वर्षांपूर्वी तिने या व्यसनावर यशस्वीरित्या मात केली असून आता ती व्यसनमुक्त आहे. 'यमला पगला दिवाना 2' या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान धर्मेंद्र यांनी त्यांच्या व्यसनाविषयी सांगितलं होतं. दारुचं व्यसन लागल्यामुळे त्यांचं करिअर संपुष्टात आलं असं त्यांनी सांगितलं होतं. सतत दारु प्यायल्यामुळे २०११ मध्ये त्यांची तब्येत बिघडू लागली. त्यामुळे त्यांनी या व्यसनाला कायमचा रामराम केला. फार कमी जणांना माहित असेल की रणबीर कपूरदेखील व्यसनांच्या आहारी गेला होता. त्याला दारु आणि ड्रग्सचं प्रचंड व्यसन होतं. रणबीरला हुक्काचीदेखील सवय होती असं सांगण्यात येतं.
अमली पदार्थांच्या आहारी गेले होते ‘हे’ दिग्गज सेलिब्रिटी
पडद्यामागील कलाकारांची दुनिया
Web Title: Bollywood and drugs stars of bollywood have also been named in the case of drugs many have destroyed their careers ssj