• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bhojpuri actor ravi kishan came mumbai from jaunpur with rs 500 now he have this much property ssv

एकेकाळी उपाशीपोटी झोपणाऱ्या रवी किशन यांच्याकडे आता आहे इतकी संपत्ती

Updated: September 10, 2021 14:24 IST
Follow Us
    • भोजपुरी सिनेमांचा अमिताभ बच्चन अशी ओळख असलेल्या रवी किशन यांचे असंख्य चाहते आहेत. आतापर्यंत २०० हून अधिक सिनेमे केलेल्या रवी यांचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता.
    • रवी सांताक्रुझ येथे १० बाय १२ चौरस फुटांचे घर असलेल्या चाळीत राहायचे.
    • पाच भावंडांमध्ये रवी सगळ्यात लहान आहेत. रवीचे वडील दुध डेअरीचा छोटेखानी व्यवसाय करायचे. पण ते काम बंद झाल्यानंतर रवीच्या संपूर्ण कुटुंबाला त्यांच्या गावी जौनपुरला जावे लागले.
    • गावी गेल्यानंतर रवी यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली. शेती करुन किशन कुटुंबीय थोडा फार पैसा कमवत होते. रवी यांचे संपूर्ण कुटुंबीय मातीच्या घरात राहायचे.
    • रवी यांचे अभ्यासात कधीच मन लागले नाही. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, ‘दिवाळीत आईसाठी एखादी साडी घ्यावी एवढेही पैसे आमच्याकडे नसायचे. मी मरेन किंवा वेडा होईन किंवा गुंड बनेल असाच विचार सतत माझ्या मनात यायचा.’
    • रवी किशन लहानपणापासूनच बच्चन यांचे सिनेमे पाहायचे. ‘मैं फेंके हुए पैसे आज भी नहीं लेता’ या संवादाने ते एवढे प्रभावित झाले की आपणही अभिनेताच व्हायचे असा निर्णय त्यांनी घेतला. रवी यांनी रामलीलामध्ये सीताची व्यक्तिरेखा साकारली होती. हाच त्यांचा अभिनयातला पहिला अनुभव होता.
    • जेव्हा रवी १७ वर्षांचे झाले तेव्हा आईने त्यांना ५०० रुपये दिले होते. ते ५०० रुपये घेऊन ते मुंबईला पळून आले. मुंबईत एका चाळीत राहून सिनेमांमध्ये काम मिळते का ते पाहू लागले. रवी यांनी त्यांच्या एका विधानात म्हटले होते की, "जर माझ्या वडिलांनी पट्याने मला मारलं नसतं तर मी गुंड झालो असतो."
    • रवी यांना सुरुवातीच्या काळात बी ग्रेड सिनेमेच मिळत गेले. या सिनेमांमधून त्यांनी ५००० रुपये कमवले. रवी यांना 'तेरे नाम' या सिनेमांतून बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. या सिनेमात रवी यांनी जे कपडे वापरले होते ते त्यांच्या वडिलांचे होते.
    • जेव्हा रवी बॉलिवूडमध्ये सिनेमे मिळवण्यासाठी धडपडत होते. तेव्हाच त्यांना भोजपुरीमध्येही सिनेमांच्या ऑफर्स येत होत्या. हळूहळू रवी किशन हे भोजपुरी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होत गेलं.
    • केवळ ५०० रुपये घेऊन मुंबई आलेल्या रवी किशन यांच्याकडे आज १४ कोटींहून अधिक संपत्ती आहे.
    • त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू, फॉक्सवॅगन पोलो, टोयोटो फॉर्च्युनर, इनोव्हा, मर्सिडीज बेंज, ऑडी ए ६, हार्ले डेव्हिडसन यांसारख्या महागड्या गाड्या आहेत.
    • कधीकाळी वडापाव खाऊन जगणारे रवी किशन आता एका चित्रपटासाठी ५० लाख रुपये मानधन घेतात.
    • रवी यांच्या स्टारडममध्ये बिग बॉसचाही फार मोठा हात आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याकडे सिनेमांच्या ऑफर्सचा पाऊस पडू लागला.
    • रवी यांच्या पत्नीचे नाव प्रिती आहे. रवी आणि प्रिती अकरावीत असल्यापासून एकमेकांना ओळखायचे.
    • सर्व छायाचित्र सौजन्य – फेसबुक/ रवी किशन

Web Title: Bhojpuri actor ravi kishan came mumbai from jaunpur with rs 500 now he have this much property ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.