Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ganesh chaturthi celebration bollywood celebs ssj

सेलिब्रिटी अन् बाप्पा : ‘ही’ कलाकार मंडळी करतात वर्षोनुवर्ष गणरायाची सेवा

सेलिब्रिटींच्या घरची बाप्पाची परंपरा

August 22, 2020 12:15 IST
Follow Us
    • गणेशोत्सव म्हटला की सगळीकडे चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण असतं त्यामुळे सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटीदेखील गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. यात काही असे सेलिब्रिटी आहेत ज्यांच्याकडे वर्षोनुवर्षे बाप्पाची सेवा केली जाते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून गणरायाच्या सेवेत लीन होणाऱ्या सेलिब्रिटींविषयी जाणून घेऊयात. (सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस/ financial express)
    • बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या घरी जवळपास १२ वर्षांपासून गणरायाचं आगमन होतं आहे.राणीची बाप्पावर अपार श्रद्धा असून ती कायम तिच्या यशाचं श्रेयं गणरायाला देताना दिसते.
    • नाना पाटेकर यांच्या वडिलांपासून घरात गणपतीचं आगमन होतं. तोच वारसा नानांनी पुढे चालू ठेवला आहे. विशेष म्हणजे नाना स्वत: गणपतीच्या डोळ्यांना आकार देतात असं म्हटलं जातं.
    • अभिनेत्री शिल्पा शेट्टी दरवर्षी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करते. गेल्या कित्येक वर्षांपासून तिच्याकडे बाप्पाचं आगमन होत आहे.
    • अभिनेता तुषार कपूर यांच्या घरीदेखील दरवर्षी बाप्पाची स्थापना होते. या काळात तुषारच्या घरी संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र येतं आणि हा उत्सव आनंदात साजरा करतात.
    • अभिनेता सलमान खान यांच्या घरच्या बाप्पाविषयी साऱ्यांनाच ठाऊक आहे. दरवर्षी सलमान खान गाजतवाजत बाप्पाचं आगमन आणि विसर्जन करत असतो.
    • अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या घरीदेखील काही वर्षांपासून बाप्पाचं आगमन होताना दिसतं. दरवर्षी श्रद्धा बाप्पासोबतचे फोटो किंवा सेल्फी सोशल मीडियावर शेअर करत असते.
    • अभिनेता विवेक ओबेरॉय याने २००७ पासून घरी गणपती बाप्पाची स्थापना करण्यास सुरुवात केली. या दिवशी तो घरी एक लहानशी पुजादेखील ठेवतो. शूटआऊट अॅट वडाला या चित्रपटापूर्वी विवेकचे अनेक चित्रपट अपयशी ठरले होते. मात्र २००७ मध्ये बाप्पाची घर स्थापना केल्यापासून त्याला करिअरमध्ये यश मिळाल्याचं तो म्हणतो.
    • अभिनेता गोविंदा याच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन होतं. मात्र या उत्सवात फार मोजके आणि जवळचेच नातेवाईक , मित्रपरिवार सहभागी होतात.
    • 1/

      अभिनेता हृतिक रोशन याच्या घरीदेखील बाप्पाचं गेल्या कित्येक वर्षांपासून आगमन होत आहे.

    • 2/

      मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे आणि त्याचा बाप्पा

    • 3/

      अभिनेता सोनू सूद दरवर्षी वाजतगाजत बाप्पाचं स्वागत करतो.

TOPICS
गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025

Web Title: Ganesh chaturthi celebration bollywood celebs ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.