-
बंगळुरूच्या संघाने चेन्नईवर ३७ धावांनी विजय मिळवला. विराटची दमदार फलंदाजी आणि ख्रिस मॉरिसची भेदक गोलंदाजी याच्या बळावर RCB संघाने धोनीच्या CSKला धूळ चारली. (फोटो- IPL.com)
-
दुबईच्या मैदानात झालेल्या या सामन्यात विराटची खेळी खास ठरलीच. पण त्याचसोबत आणखी खास ठरली ती विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची उपस्थिती… (फोटो- IPL.com आणि सोशल मीडिया)
-
विराटने केलेल्या ९० धावांच्या तडफदार खेळीची शनिवारी अनुष्का शर्मा साक्षीदार ठरली. (यापुढील सर्व फोटो- सोशल मीडिया)
-
अनुष्का शर्मा IPL सुरू झालं तेव्हा भारतात होती.
-
अनुष्का गरोदर असल्याचं विरूष्काने सोशल मीडियावरूनच जाहीर केलं होतं.
-
ती गरोदर असल्याने तिने परदेशी प्रवास करणं टाळलं असावं अशी चर्चा रंगली होती.
-
परंतु शनिवारी अनुष्का शर्मा थेट दुबईच्या मैदानातच हजर झाली.
-
काळ्या रंगाचा बलून ड्रेस परिधान करून ती बंगळुरू संघाच्या कॅम्पमध्ये बसलेली दिसली.
-
विराटने झळकावलेलं अर्धशतक आणि केलेली धडाकेबाज खेळी पाहून अनुष्काने उभं राहून टाळ्या वाजवल्या.
-
विराटच्या तडाखेबंद ९० धावांच्या खेळीनंतर तो नाबाद तंबूत परत असताना अनुष्काने त्याला 'फ्लाइंग किस'देखील दिला आणि आपलं प्रेम व्यक्त केलं.
-
चाहत्यांसमोर किंवा चारचौघात आपलं प्रेम व्यक्त करायला कधीही न घाबरणाऱ्या विरूष्काने शनिवारी दुबईच्या मैदानातही खास प्रकारे प्रेम व्यक्त केलं.
विराटची झक्कास खेळी अन् अनुष्काने स्टेडियममधून दिलेला ‘फ्लाइंग किस’…
अनुष्का-विराट चारचौघात प्रेम व्यक्त करण्यास कधीही घाबरत नाहीत…
Web Title: Anushka sharma virat kohli amazing reaction flying kiss ipl 2020 uae dubai stadium stands superb batting kiss goes viral sets twitter on fire vjb