• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. hema malini turns 78 rare photos of the dream girl nck

‘ड्रीम गर्ल’चे कधीच न पाहिलेले फोटो

October 16, 2020 17:24 IST
Follow Us
    • बॉलिवूडची ड्रीम गर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणाऱ्या हेमा यांची लोकप्रियता आजही कायम आहे. हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस आहे. पाहूयात बॉलिवूडच्या ड्रीम गर्लचे दुर्लभ फोटो पाहूयात….
    • बॉलिवूडमध्ये हेमा मालिनी यांनी पाच दशकांच्या कारकिर्दीत आपल्या अदांनी आणि अभिनयाने सर्वांना वेड लावले.
    • उत्तम नृत्यांगणा, अभिनेत्री, निर्माती आणि आता राजकारणातील सक्रिय नेत्या असलेल्या हेमा मालिनी यांनी वयाच्या १५व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
    • हेमा मालिनी यांनी यश चोप्रा, रमेश सिप्पी, रामानंद सागर यांसारख्या अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले असून, आजही त्या 'ड्रीम गर्ल' म्हणूनच ओळखल्या जातात.
    • 'सपनो का सौदागर' या १९६८ साली आलेल्या चित्रपटाने हेमा यांनी राज कपूर यांच्यासह बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
    • पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या. आजही त्यांच्या भूमिका सिनेप्रेमींच्या लक्षात आहेत.
    • 'जॉनी मेरा नाम' (१९७०), 'अंदाज' (१९७१), 'सीता और गीता' (१९७२), 'शोले' (१९७५), 'ड्रीम गर्ल' (१९७७), 'त्रिशूल' (१९७८) या चित्रपटांतील दमदार भूमिकांनी हेमा मालिनी यांनी त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवले.
    • ८० च्या दशकात हेमा यांनी 'क्रांती', 'कुदरत', 'सत्ते पे सत्ता', 'अंधा कानून' या चित्रपटांमध्ये काम केले. शाहरुख खान आणि दिव्या भारती यांच्या १९९० साली आलेल्या 'दिल आशना है' चित्रपटाने त्यांनी निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले.
    • हेमा मालिनी यांना २००० साली 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
    • हेमा मालिनी यांनी २००४ साली भारतीय जनता पार्टीमध्ये पाऊल टाकले. तेव्हापासून त्या आजपर्यंत राजकारणात सक्रिय नेत्या म्हणून कार्यरत आहेत.

Web Title: Hema malini turns 78 rare photos of the dream girl nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.