-
छोट्या पडद्यावरील विशेष लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘इंडियाज बेस्ट डान्सर’. ( सर्व फोटो सौजन्य : मलायका अरोरा / इंस्टाग्राम )
-
सध्या हा कार्यक्रम विविध कारणांसाठी चर्चेत आहे.
-
इंडियाज बेस्ट डान्सर ग्रँड फिनालेमध्ये मलायकाने दमदार नृत्य केले.
-
काही दिवसांपूर्वी मलायका अरोराला करोनाची लागण झाली होती. त्यामुळे तिने काही काळासाठी या कार्यक्रमापासून फारकत घेतली होती.
-
मलायका नसल्यामुळे नोरा या कार्यक्रमात परिक्षक पदाची भूमिका पार पाडत होती.
-
मलायका बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असून बऱ्याचदा ती तिच्या डान्सच्या व्हिडीओमुळे चर्चेत असते.
-
बॉलीवूडमध्ये सगळ्यात फिट आणि हिट म्हणून अभिनेत्री मलायका अरोरा ओळखली जाते.
-
वयाची चाळीशी ओलांडलेली मलायका आजही एखाद्या तरुण अभिनेत्रीप्रमाणे ग्लॅमरस अंदाजात दिसून येते.
-
बॉलिवूडमध्ये ‘छैय्या छैय्या’ ते ‘मुन्नी बदनाम हुई’ पर्यंत मलायकाचं प्रत्येक गाणं सुपरहिट ठरलं आहे. त्यात ‘गुर नाल इश्क मिठा’, ‘आयो रे मारो ढोल ना’, ‘प्यार के गीत’ ही तिची काही प्रसिद्ध गाणी आहेत.
-
ग्लॅमरस अंदाजाने भूरळ घालणारी मलायका एमटीव्ही इंडिया लाँच झालं तेव्हा तिने व्हिजे म्हणून तेथे काम केलं होतं. त्यानंतर तिने अनेक कार्यक्रमांचे सहसूत्रसंचालनही केले.
पाहा मलायकाचा जलवा, घायाळ करणाऱ्या नृत्यअदा
इंडियाज बेस्ट डान्सर ग्रँड फिनालेमध्ये मलायकाने दमदार नृत्य केले.
Web Title: Malaika arora dance in indias best dancer grand finale asy