• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sunny deol anil kapoor rift when hema malini stepson sunny deol strangle sonam kapoor father ssv

शूटदरम्यान सनीने खरोखरंच आवळला होता अनिल कपूर यांचा गळा; ‘या’ गोष्टीमुळे होता संतप्त

दिग्दर्शकाने कट बोलल्यानंतरही थांबला नव्हती सनी देओल

Updated: September 9, 2021 00:39 IST
Follow Us
    • बॉलिवूडमध्ये ८०-९०चा काळ गाजवणारा अभिनेता म्हणजेच सनी देओल. ‘ये ढाई किलो का हाथ जब किसी पे पड़ता है न, तो आदमी उठता नहीं उठ जाता है’ या एका संवादामुळे त्याने अनेकांच्या मनावर राज्य केलं. मोठ्या पडद्यावर 'अँग्री मॅन' वाटणाऱ्या सनी देओलने एकदा शूटिंगदरम्यान अनिल कपूर यांचा गळा आवळला होता.
    • सनी आणि अनिल कपूर यांनी 'जोशीले' या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. या चित्रपट अभिनेत्री श्रीदेवीचीही भूमिका होती.
    • या चित्रपटात श्रेयनामावलीत अनिल कपूर यांचं नाव सनी देओलच्या आधी दाखवलं गेलं होतं. याच गोष्टीमुळे तो नाराज झाला होता. नंतर दिग्दर्शक शेखर कपूर यांनी समजावल्यानंतर तो शांत झाला होता.
    • त्यानंतर त्याचवर्षी अनिल कपूर आणि सनी देओल यांनी 'राम अवतार' या चित्रपटात एकत्र काम केलं.
    • या चित्रपटात सनी देओल हा अनिल कपूर यांना मारतोय, असा एक अॅक्शन सीन होता. यामध्ये सनीला अनिल कपूर यांचा गळा आवळायचा होता.
    • या सीनसाठी दिग्दर्शकांनी आधीच सनीला सूचना दिल्या होत्या. गळा जास्त आवळू नको असंही त्यांनी त्याला स्पष्ट सांगितलं होतं. मात्र सीन शूट करताना सनीला जुन्या गोष्टी आठवल्या आणि त्याने त्याचा राग अनिल कपूर यांच्यावर काढला.
    • दिग्दर्शकांनी कट बोलल्यानंतरही सनीने अनिल कपूर यांचा गळा सोडला नव्हता. अखेर दिग्दर्शकांना सनीजवळ जाऊन त्याला थांबवावं लागलं होतं.
    • या चित्रपटानंतर अनिल कपूर आणि सनी देओल कधीच एकमेकांशी चांगले बोलले नाहीत.
    • सर्व छायाचित्र सौजन्य- सोशल मीडिया

Web Title: Sunny deol anil kapoor rift when hema malini stepson sunny deol strangle sonam kapoor father ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.