• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. google doodles paying tribute to indian personalities vsk

‘हे’ आहेत गुगलने डुडलमधून मानवंदना दिलेले भारतीय

Updated: September 9, 2021 00:33 IST
Follow Us
  • गुगल हे आपल्या डुडलमधून महत्त्वाच्या घटनांचे स्मरण करत असतं. जगभरातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना घटनांना मानवंदना देत असतं. आजचं गुगल डुडलही असंच खास आहे. (सर्व फोटोंचे सौजन्यः गुगल)
    1/20

    गुगल हे आपल्या डुडलमधून महत्त्वाच्या घटनांचे स्मरण करत असतं. जगभरातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना घटनांना मानवंदना देत असतं. आजचं गुगल डुडलही असंच खास आहे. (सर्व फोटोंचे सौजन्यः गुगल)

  • 2/20

    आज भारतीय वैज्ञानिक आणि प्राध्यापक उडुपी रामचंद्र राव यांची जयंती. त्यांना भारताचा सॅटलाईट मॅन म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने त्यांना मानवंदना दिली आहे.

  • 3/20

    स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना गुगलची मानवंदना.

  • 4/20

    भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके ज्यांनी संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला मूकपट बनवला.

  • 5/20

    कुष्ठरोग्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांचं आयुष्य चांगलं करण्यासाठी आयुष्यभर झटत राहिले असे सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत मुरलीधर देविदास आमटे अर्थात बाबा आमटे.

  • 6/20

    पु.ल.देशपांडे, मराठी विनोदी लेखक, गीतकार, संगीतकार, अभिनेते, दिग्दर्शक, विचारवंत. ज्यांनी आपल्या लिखाणातून पोटभरून हसवलं त्याचबरोबर गरज पडेल तशी समाजाची कानउघडणीही केली. त्यांना समर्पित गुगलचं हे डुडल.

  • 7/20

    भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे संस्थापक आणि भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई.

  • 8/20

    दीर्घकाळ रुगणसेवा करणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांना गुगलची मानवंदना.

  • 9/20

    उर्दु साहित्यातले सर्वोत्क़ृष्ट कवी मिर्झा असदुल्लाह बैग खान अर्थात मिर्झा गालिब यांना गुगलची मानवंदना.

  • 10/20

    भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान देणारे व्ही. शांताराम यांचं हे डुडल. या डुडलमध्ये त्यांच्या ३ चित्रपटांचं चित्रण केलेलं आहे. ते चित्रपट म्हणजे अमर भूपाळी, झनक झनक पायल बाजे आणि दो आँखे बारा हाथ.

  • 11/20

    डॉ. जोहरा बेगम काझी या भारतीय वंशाच्या भौतिकशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि समाजसुधारक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला सलाम करणारं हे डुडल.

  • 12/20

    भारतीय चित्रपटसृष्टीतले सामर्थ्यवान अभिनेते अमरीश पुरी यांना समर्पित डुडल.

  • 13/20

    विज्ञानाच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या आणि विज्ञानाच्या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणजे डॉ. असीमा चॅटर्जी.

  • 14/20

    भारतीय अभिनेते फारुक शेख यांना समर्पित डुडल.

  • 15/20

    जगभरातल्या रसिकांना आपल्या जादुई आवाजाने भुरळ पाडणारे गायक किशोर कुमार यांना समर्पित हे डुडल.

  • 16/20

    जगभरात आपल्या अभिनयाची आणि सौंदर्याची छाप सोडणारी अभिनेत्री मधुबाला हिच्या जयंतीनिमित्त डुडल.

  • 17/20

    भारतीय सिनेसृष्टीवर, मोठ्या पडद्यावर पुरुषांचं वर्चस्व असणाऱ्या काळात स्त्रीकेंद्री चित्रपट करणारी आणि त्यात सामर्थ्यवान स्त्रियांची भूमिका साकारणारी अभिनेत्री नूतन.

  • 18/20

    पार्श्वगायनाचा राजा ज्यांना म्हटलं जायचं असे गायक मोहम्मद रफी यांना समर्पित डुडल.

  • 19/20

    भारतीय लेखक आर. के. नारायण, आजही लोक ज्यांच्या मालगुडी डेजच्या प्रेमात आहेत. त्यांना गुगलने दिलेली मानवंदना.

  • 20/20

    भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना जोहरा सेहगल यांना गुगलने दिलेली मानवंदना.

TOPICS
गुगल डूडलGoogle Doodleभारतीय चित्रपटIndian Cinema

Web Title: Google doodles paying tribute to indian personalities vsk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.