-
सिनेसृष्टीत सर्वात मानाचा असलेल्या दादासाहेब फाळके हा पुरस्कार दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
-
सिनेसृष्टीत महत्वाची कामगिरी करणाऱ्या अभिनेत्याला दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जात. यंदाचा हा पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया रजनीकांत यांचा जीवन प्रवास..
-
रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० साली बंगळूरू येथे एका मराठी कुटूंबात झाला
-
रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे.
-
रजनीकांत यांचे वडील रामोजीराव गायकवाड हे हवलदार होते. त्यांच्या आईच नाव जिजाबाई आहे. रजनीकांत हे लहान असताना त्यांच्या आईचे निधन झाले.
-
रजनीकांत यांना चार भावंडे. आईच्या मृत्युनंतर रजनीकांत यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. घर चालवण्यासाठी त्यांनी काम करण्यास सुरुवात केली.
-
काही दिवसांनंतर त्यांनी ‘बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’मध्ये ‘कंडक्टर’ म्हणून काम करायला सुरुवात केली.
-
बस कंडक्टर म्हणून रजनीकांत हे लोकप्रिय होते. तिकीट देण्याच्या अनोख्या स्टाइलमुळे ते लोकप्रिय होते.
-
रजनीकांत यांना अभिनयाची आवड होती त्यामुळे त्यांनी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
-
आपल्याला जे आवडते त्यात करिअर करण्यासाठी रजनीकांत यांनी नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी अभिनयाचे धडे घेण्यास सुरुवात केली.
-
एका नाटकादरम्यान प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक के. बालाचंद्र यांनी रजनीकांत यांना पाहिले आणि त्यांनी रजनीकांत यांना चित्रपटाची ऑफर दिली
-
रजनीकांत यांनी १९७५ मध्ये ‘अपूर्व रागंगल’ या तामिळ चित्रपटाद्वारे कलाविश्वात पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. कमल हसन यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात रजनीकांत यांना केवळ १५ मिनीटांची भूमिका मिळाली होती..
-
रजनीकांत यांनी एथिरात कॉलेजच्या विद्यार्थिनी लता यांच्याशी लग्न केले. लता कॉलेजच्या मॅगझीनसाठी रजनीकांत यांची मुलाखत घेण्यासाठी गेल्या होत्या आणि पहिल्याच भेटीत रजनीकांत लताच्या प्रेमात पडले.
-
रजनीकांत आणि लता यांनी २६ फेब्रुवारी १९८१ रोजी आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिरात लग्न केलं.
बस कंडक्टर ते सुपरस्टार; रजनीकांत यांचा प्रेरणादायी प्रवास
रजनीकांत यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे
Web Title: From a bus conducter to an superstar know about dadasaheb phalke award winner rajnikant avb