-
कलाकार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.
-
ते त्यांचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात.
-
पण शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांना बऱ्याच वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
-
असेच काहीसे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंजुम फकीहसोबत घडले आहे.
-
अंजुमने इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिकिनी परिधान करुन फोटो शेअर केला होता.
-
या लूकमध्ये ती अतिशय हॉट दिसत होती.
-
पण नेटकऱ्यांनी तिला बिकिनी परिधान केल्यामुळे ट्रोल केले आहे.
-
एका यूजरने 'अंजुम, असे कपडे घालू नकोस. तू मुस्लिम आहे तरी देखील असे कपडे का घातले?' असे म्हटले.
-
तर दुसऱ्या एका यूजरने 'हे काय आहे? मुस्लिम असूनही तू असे कपडे कशी घालू शकतेस?' असे म्हटले आहे.
-
अंजुमला सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.
-
यापूर्वी अंजुमने महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले होते.
-
अंजुमने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
-
तिने 'एक था राजा एक थी रानी', 'दिल ही तो है', 'देवांशी' आणि 'नागिन 5' या मालिकांमध्ये काम केले आहे.
-
तिला 'कुंडली भाग्य' आणि 'कुमकुम भाग्य' या मालिकांनी लोकप्रियता मिळवून दिली.
-
२०२०मध्ये अंजुम 'कश्मकश' या वेब शो मध्ये दिसली होती.
‘मुस्लिम असूनही असे कपडे का घालते?’, बिकिनी परिधान केल्यामुळे अभिनेत्री झाली ट्रोल
यापूर्वी तिने महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्यामुळे ट्रोल करण्यात आले होते.
Web Title: Kundali bhagya fame anjum fakih brutally trolled and abused on wearing bikini watch photos avb