• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. happy birthday sonam kapoor ahuja know about her fat to fit information movies hot bold photos sdn

Birthday Special : बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सोनमचं होतं तब्बल इतकं वजन

June 9, 2021 10:40 IST
Follow Us
  • Sonam Kapoor Ahuja Birthday
    1/20

    ग्लॅमरस अभिनेत्री सोनम कपूरचा आज वाढदिवस आहे.

  • 2/20

    गेल्या काही काळापासून कलाविश्वामध्ये स्टारकिडची चलती असल्याचं पाहायला मिळतंय. आतापर्यंत अनेक स्टारकिडने कलाविश्वात पदार्पण केलं आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री सोनम कपूर.

  • 3/20

    अभिनेता अनिल कपूर यांच्या लेकीने सोनमने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘सावरियाँ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

  • 4/20

    सोनमचा जन्म ९ जून १९८५ रोजी मुंबईतल्या चेंबूरमध्ये झाला.

  • 5/20

    जुहू इथल्या आर्यविद्यामंदिर शाळेत तिने शिक्षण पूर्ण केलं.

  • 6/20

    शालेय जीवनापासूनच तिला बास्केटबॉल आणि नृत्याची खूप आवड आहे.

  • 7/20

    जॅज आणि कथ्थकचं तिने प्रशिक्षणसुद्धा घेतलं आहे.

  • 8/20

    युनिव्हर्सिटी ऑफ इस्ट लंडन इथून तिनं पदवीचं शिक्षण घेतलं.

  • 9/20

    अनिल कपूर हे इंडस्ट्रीतलं मोठं नाव असलं तरी सोनमला बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी संघर्ष करावा लागला.

  • 10/20

    संजय लीला भन्साळी यांची असिस्टंट म्हणून ती सुरुवातीला काम करत होती.

  • 11/20

    बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिचं वजन तब्बल ८६ किलो इतकं होतं.

  • 12/20

    बरीच मेहनत घेत, वर्कआऊट करत तिने हे वजन कमी केलं आणि ‘सावरियाँ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं.

  • 13/20

    २००९ मध्ये ‘दिल्ली ६’ या चित्रपटातील ‘मसक्कली’ सोनम अनेकांनाच भावली. पण बॉक्स ऑफीसवर हा चित्रपटसुद्धा दणक्यात आपटला.

  • 14/20

    ‘आय हेट लव्ह स्टोरी’, ‘आयशा’ यांसारख्या चित्रपटांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र इथेही तिला अपेक्षित यश मिळालं नाही.

  • 15/20

    ‘थँक्यू’, ‘प्लेअर’ असे एकानंतर एक सोनमचे चित्रपट फ्लॉप ठरू लागले.

  • 16/20

    अखेर २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रांझना’ चित्रपटाने तिच्या विस्कटलेल्या करिअरची घडी बसवली असं म्हणायला हरकत नाही.

  • 17/20

    त्यानंतर २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘नीरजा’ हा चित्रपट तिच्यासाठी मैलाचा दगड ठरला.

  • 18/20

    सोनमच्या एकंदर वागण्याबोलण्याचा अंदाज आणि फॅशन जगतातील तिचा वावर पाहता बॉलिवूडची ‘फॅशनिस्टा’ म्हणूनही ती नावारुपास आली.

  • 19/20

    अभिनय आणि फॅशन विश्वात आपलं स्थान निर्माण करणाऱ्या सोनमने प्रियकर आनंद अहुजाशी लग्न केलं.

  • 20/20

    (सर्व फोटो सौजन्य : सोनम कपूर / इन्स्टाग्राम)

Web Title: Happy birthday sonam kapoor ahuja know about her fat to fit information movies hot bold photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.