Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. tribute paid to dilip kumar in pakistan photos and video viral on internet srk

Dilip Kumar Death : पाकिस्तानातही शोक, चाहत्यांनी दिलीपकुमार यांच्या वडिलोपार्जित घरी अदा केली नमाज

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलीवूड आणि जगभरातील त्यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत

July 8, 2021 15:55 IST
Follow Us
  • Dilip Kumar Death, Dilip Kumar Passed Away, dilip kumar pakistan house
    1/6

    ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे दीर्घ आजारानंतर बुधवारी सकाळी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिलीप कुमार हिंदी चित्रपटविश्वात ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून प्रसिद्ध होते. गेल्या मंगळवारी त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलीवूड आणि जगभरातील त्यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. लोकांनी दिलीपकुमार यांना त्यांच्या वडिलोपार्जित पाकिस्तानातील पेशावर शहरातील घरात श्रद्धांजली वाहिली. (photo @ShirazHassan twitter)

  • 2/6

    दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी पाकिस्तानच्या पेशावर शहरात झाला होता. ते पाकिस्तानातून मुंबईला आले होते. पण दिलीप कुमार त्यांचे बालपण आणि पेशावरमधील घराची नेहमीच आठवण काढत असत. दिलीपकुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांनीही पेशावर येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरी नमाज अदा केली. याशिवाय मेणबत्त्या लावून लोकांनी आपल्या आवडत्या कलाकाराला निरोप घेतात. पेशावरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे. (photo @ShirazHassan twitter)

  • 3/6

    पाकिस्तानचे उच्चपदस्थ नेतृत्व आणि लोकांनी दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल बुधवारी शोकसंवेदना व्यक्त केल्या. दिलीप कुमार यांचा जन्म येथे झाला होता आणि त्यांना या देशाचा ‘निशान-ए-पाकिस्तान’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला होता.

  • 4/6

    दिलीप कुमार हे अत्यंत नम्र अभिनेते होते, असे पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी ट्विटरवर लिहिले आहे. आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ कर्करोग रुग्णालय उभारण्याकरिता दिलीप कुमार यांनी दाखवलेले औदार्य आम्ही कधीच विसरू शकत नाही, असे सांगून पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. . (photo @ShirazHassan twitter)

  • 5/6

    दिलीप कुमार यांना त्यांच्या अभिनय कारकीर्दीत आठ फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी पहिला फिल्मफेअर मिळवणारेही ते पहिलेच अभिनेते होते. सर्वाधिक पुरस्कार जिंकण्याचा त्यांचा हा विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आला आहे. दिलीप कुमार यांच्यानंतर शाहरूख खान याने आठ फिल्मफेअर पुरस्कार मिळवण्याचा मान पटकावला आहे. (photo indian express)

  • 6/6

    भारतीय चित्रपटसृष्टीत अजरामर ठरलेल्या या दिग्गज अभिनेत्याला १९९१ मध्ये पद्मभूषण आणि २०१५ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. १९९४ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर १९९८ मध्ये त्यांना पाकिस्तानकडून निशान-ए-इम्तियाज या सर्वोत्कृष्ट नागरिक सन्मान पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. पाकिस्तानने दिलेला हा पुरस्कार स्वीकारल्यामुळे त्यांना शिवसेनेकडून रोषही पत्करावा लागला होता. (photo indian express)

TOPICS
दिलीप कुमारDilip Kumarमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tribute paid to dilip kumar in pakistan photos and video viral on internet srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.