• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasya jatra actors facilitated by cm uddhav thackeray scsg

Photos: ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ ते ‘विनोदाची डबल डेक्कर’ सारेच पोहोचले मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी

गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कालाकारांनी भेट घेतली

July 9, 2021 16:18 IST
Follow Us
  • Maharashtrachi Hasya Jatra
    1/20

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टिमचे कौतुक करण्यात आलं.

  • 2/20

    ज्येष्ठ रंगकर्मी मुळ्येंचा ‘माझा पुरस्कार’ 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'तील कलाकारांना प्रदान करण्यात आला.

  • 3/20

    ‘रोजच्या जगण्यातला विनोद हा निराशा दूर करून सकारात्मकता निर्माण करतो. कोविडनंतर दाटणारी निराशा दूर करण्याचे काम ‘हास्यजत्रा’ची टीम करत आहे. तुम्ही नेमक्या वेळी ज्या गोष्टीची जास्त गरज आहे, ते काम करत आहात, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या ‘माझा पुरस्कार’ विजेत्यांचे 'हास्यजत्रे'च्या कलाकारांचं वर्षा येथील निवसस्थानीकौतुक केलं.

  • 4/20

    अशोक मुळ्ये यांच्या “माझा पुरस्कार’ उपक्रमाचे हे बारावे वर्ष होते. यंदाच्या या पुरस्कारांसाठी सोनी मराठी निर्मित ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांची निवड करण्यात आलीय.

  • 5/20

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील पुरस्कार विजेत्या कालाकांना गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी सन्मानित करण्यात आलं.

  • 6/20

    यावेळी पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर उपस्थित होते.

  • 7/20

    या सोहळ्यास सोनी मराठी वाहिनीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, नॉन फिक्शन हेड अमित फाळके, निर्माता दिग्दर्शक प्रसाद ओक, अभिनेत्री प्राजक्ता माळीही उपस्थित होती.

  • 8/20

    हास्यजत्राच्या टिमधील वनिता खरात, दत्तात्रय मोरे, अमीर हडकर, चेतना भट, शिवाली परब, पृथ्वीक कांबळे, ओंकार राऊत, ओंकार भोजणे, पंढरीनाथ कांबळे आदीही यावेळी उपस्थित होते.

  • 9/20

    तुम्ही मंडळी कोणते काम करता, त्याचे परिणाम काय होतात, हे महत्वाचे ठरते. संकटाचा काळ संपून गेल्यावर, मागे वळून पाहताना त्या कामाचे महत्व कळते. आता कोविडच्या संकटात दुसरी लाट ओसरतेय. तिसरी लाट येईल याची भिती आहे. दररोजच आम्ही त्याचा विचार करतो. निर्बंध कुणालाच आवडत नाही. पण निर्बंध, नियमावली यामुळे आणि आजारानंतर अनेकांना निराशा ग्रासते. त्यावेळी विनोदाचे महत्व पटते. यंत्राने आवाज करू नये. ते व्यवस्थित चालावे म्हणून वंगण घालतो. त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या जगण्यात विनोद हे वंगणाचे काम करते, असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.

  • 10/20

    विनोद निर्मितीचे मोठे काम विनोदी लेखक, कलाकार करतात. सातत्याने हसविणे हे कठीण काम असते. नवनवीन सुचत राहणे अवघड असते. पण हे मोठे काम हास्य जत्राची टीम करते आहे. चांगले काम करणारे कलावंत आणि मनोरंजन क्षेत्राला नेहमीच पाठबळ दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

  • 11/20

    कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लेखक सचिन मोटेंचाही सत्कार झाला.

  • 12/20

    तसेच निर्माता दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनाही पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

  • 13/20

    लेखक-अभिनेते समीर चौगुलेंचाही सन्मान करण्यात आला. त्यांनी आपल्या इन्स्ताग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहे.

  • 14/20

    विनोदाची डबल डेक्कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसाद खांडेकरांनाही पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

  • 15/20

    अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

  • 16/20

    फिल्टर पाड्याचा बच्चन अशी ओळख असणाऱ्या गौरव मोरेलाही यावेळी सन्मानित करण्यात आलं.

  • 17/20

    आपल्या विनोदी अभिनयामुळे घरोघरी पोहोचलेल्या नम्रता संभेरावचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

  • 18/20

    वर्षा बंगल्यावर झालेल्या या सत्कारामुळे हास्यजत्रेचे कलाकार भारावून गेल्याचं त्यांनी सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केलेल्या फोटोंमधून आणि कॅप्शनमधून दिसून येत आहे.

  • 19/20

    काल 'वर्षा' निवासस्थानावरील मुख्यमंत्र्यांसोबतचा एक तास अविस्मसणीय होता, असं समीर चौघुलेंनी म्हटलं आहे.

  • 20/20

    सर्वच कलाकारांनी या पुरस्कारासाठी रसिकांचे आभार मानलेत. (सर्व फोटो सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

TOPICS
मराठी मालिकाMarathi Serialsमराठी सेलिब्रिटी

Web Title: Maharashtrachi hasya jatra actors facilitated by cm uddhav thackeray scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.