-
बॉलिवूड दुनियेत काही असेही चित्रपट आहेत जे कायम आठवणीत राहतील. याच चित्रपटांच्या यादीमध्ये 'शोले' याचा ही समावेश होतो. या चित्रपटातील प्रत्येक पात्रांनी प्रेक्षकांना आपलंसं केलंय. 'शोले' चित्रपटातील 'सांभा' हे एक असं पात्र आहे ज्याला कुणीच विसरू शकत नाही.
-
'सांभा' या चित्रपटातील खलनायक असलेल्या गब्बरचा उजवा हात दाखवलाय. ही भूमिका मॅक मोहनने साकारलीय. 'शोले' चित्रपटातील 'सांभा'ची मुलगी आता मोठी झाली असून सध्याच्या बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकेल इतकी सुंदर दिसू लागली आहे.
-
मॅक मोहनला एकूण तीन अपत्य आहेत. त्याची दुसरी मुलगी विनती मक्किनी गेल्या अनेक वर्षांपासून लाइमलाइटमध्ये येत आहे. सोशल मीडियावर आपल्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांवर भूरळ घालत असते.
-
खरंतर, विनती मक्किनी इतकी सुंदर दिसते कि जर ती चित्रपटसृष्टीत आली तर भल्या भल्या अभिनेत्रींना सौंदर्यामध्ये मागे टाकू शकेल. ती एक उत्तम अभिनेत्री, प्रोड्यूसर आणि स्क्रीन रायटर आहे. तिच्या कुटुंबियांशी तिची खूप जवळीक आहे.
-
मॅक मोहन यांनी १९८६ रोजी मिनी मक्किनी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची मोठी मुलगी मंजिरी सध्या बॉलिवूडमध्ये दिग्दर्शन करते.
-
मॅक मोहन यांच्या दोन्ही मुली मंजरी आणि विनती आपल्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाल्या आहेत. त्या दोघींनी यापुर्वी 'डेजर्ट डॉल्फिन' नावाच्या चित्रपटात काम केलंय. मंजरी 'डेजर्ट डॉल्फिन'ची लेखिका आणि दिग्दर्शिका होती.
-
विनतीने 'डेजर्ट डॉल्फिन' सहलेखिका आणि निर्मितीची धुरा सांभाळली होती. या दोघींनीही यापूर्वी क्रिस्टोफर नोलन आणि हॉलिवूडमधील इतर बऱ्याच अनेक दिग्गजांसोबत काम केलंय.
-
बॉलिवूडमधले 'सांभा' म्हणजेच मॅक मोहन आपल्यात आता राहिले नाहीत. १० मे २०१० रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. ते कॅन्सरविरोधात झुंज देत होते.
-
अभिनेते मॅक मोहनच्या बाबतीत आणखी एक गोष्ट खूप कमी लोकांना माहिती असेल. बॉलिवूडचे 'सांभा' म्हणजेच अभिनेते मॅक मोहन हे अभिनेत्री रवीना टंडनचे सख्खे मामा होते.
‘शोले’ मधल्या सांभाची मुलगी बड्या अभिनेत्रींनाही लाजवेल इतकी दिसते सुंदर; वाटते रवीना टंडनची बहिण?
‘शोले’ चित्रपटातील ‘सांभा’ची मुलगी आता मोठी असून सध्याच्या बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकेल इतकी सुंदर दिसू लागली आहे.
Web Title: Sambha of shole film aka mac mohans daughter vinati makijany is beautiful and gorgeous sister of raveena tandon prp