-
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून सारा सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोशल मीडियावर साराला धर्मावरून ट्रोल करण्यात आलं आहे.
-
साराने ५१ शक्तिपीठां पैकी एक आसाममध्ये स्थित असलेल्या कामाख्या मंदिरात देवीचे दर्शन घेतले होते. त्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले. यामुळे सारा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा शिकार झाली आहे.
-
सारा पहिल्यांदा ट्रोलिंगचा शिकार झाली नाही तर या आधी देखील साराला धर्मावरून ट्रोल करण्यात आलं आहे.
-
गेल्या वर्षी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने साराने काही फोटो शेअर केले होते. त्यावेळी 'तू मुस्लीम आहेस', म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते.
-
या आधी साराने एक बोल्ड फोटोशूट केलं होते. मात्र, तिने ते फोटो रमजानच्या महिन्यात शेअर केले होते. रमजानच्या महिन्यात साराने बोल्ड फोटो शेअर केल्याने तिला 'तू मुस्लीम आहेस, त्यामुळे निदान रमजानच्या महिन्याचा तरी मान राख,' असं म्हणतं तिला अनेकांनी ट्रोल केले आहे.
-
गेल्या वर्षी मार्चमध्ये साराने वाराणसीला गेली होती. त्यावेळी तिने गंध लावला आणि तिथल्या बाजाराचा तिने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यावेळी देखील 'तू मुस्लीम आहेस',असं म्हणतं साराला ट्रोल करण्यात आलं होतं.
-
त्यानंतर साराने गणेश चतुर्थी निमित्ताने आणखी एक फोटो शेअर केला. तो फोटो शेअर करत 'गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येणारे अडथळे दुर करतील अशी प्रार्थना करते,'असे कॅप्शन साराने दिले होते. त्यानंतर 'तू नावाने मुस्लीम आहेस. माझ्या इस्लामचं नाव खराब करू नकोस' असे म्हणतं तिला ट्रोल करण्यात आले होते.
-
गेल्या वर्षी साराने दिवाळी, भाऊबीजच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी काही फोटो शेअर केले होते. त्यावेळी देखील साराला धर्मावरून ट्रोल करण्यात आले होते.
२०१९ मध्ये साराने ख्रिसमसच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी काही फोटो शेअर केले होते. त्या फोटोवरून देखील 'तुला लाज नाही वाटतं का?', असं म्हणत अनेकांनी साराला ट्रोल केले होते. २०१८ मध्ये सारा तिची आई अभिनेत्री अमृता सिंग आणि भाऊ इब्राहिम यांनी मुंबईतील शनी मंदिरात आराधना केल्यानंतर सारा आणि ईब्राहिमने बाहेर असणाऱ्या गरजूंना खाद्यपदार्थ दान केले. त्यानंतर साराला तिचे वडील म्हणजे सैफ अली खानचा धर्म हा मुस्लीम आणि आई अमृता सिंग ही शीख असल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले होते. (All Photo Credit : Sara Ali Khan Instagram)
‘मुस्लीम आहेस तू’, या आधी देखील हिंदू मंदिरात गेल्यामुळे सारा अली खान झाली होती ट्रोल
Web Title: Sara ali khan got trolled beacause she is celebrating hindu festivals and visiting temples dcp