-
अभिनेत्री लिसा हेडन कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. खास करून आपल्या बोल्ड आणि गरोदरपणातील फोटोंमुळे लिसा अनेकदा चर्चेत आली आहे.
-
लिसा जून महिन्यात तिसऱ्यांदा आई झाली असून तिने एका मुलीला जन्म दिला आहे. या मुलीचं नाव लिसाने लारा असं ठेवलं आहे.
-
लिसाचा पती डिनोने एक पोस्ट शेअर करत मुलीचं नाव लारा ठेवल्याची बातमी चाहत्यांना दिली होती.
-
चार वर्षात तीन मुलांना जन्म दिल्याने लिसा चागलीच चर्चेत आली आहे.
-
. लिसाने २०१७ मध्ये जॅक या तिच्या मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर २०२० मध्ये पुन्हा एकदा तिला मुलगा झाला असून त्याचं नाव लिओ आहे.
-
यंदाच्या वर्षी लिसाने मुलगी लाराला जन्म दिला आहे.
-
नुकतेच लिसाने मुलीला स्तनपान करताना एक फोटोशूट केलंय.
-
मुलीला स्तनपान करतानाचे लिसाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
-
हे फोटो शेअर करत लिसाने मातृत्व आणि आई म्हणून येणाऱ्या जबाबदाऱ्यांबद्दल एक पोस्ट लिहिली आहे.
-
यातील काही फोटोंमध्ये लिसाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून ती समुद्र किनारी मुलगी लाराला स्तनपान करत असल्याचं दिसून येतंय.
-
दुसऱ्या पोस्टमध्ये लिसाने शेअर केलेल्या फोटोत तिने पांढऱ्या रंगाचं नाईट गाउनपरिधान केलं असून ती मुलीला स्तनपान करतेय.
-
"बाळ झाल्यावर गोष्टी खूप बदललेल्या वाटू लागतात. खास करून बदलेल्या हार्मोवन्समुळे असेल. दोन वर्षात दोन आणि चार वर्षाती तीन मुलं" असं म्हणत लिसाने तिसऱ्या गरोदरपणात आधीच्या दोन मुलांची जबाबदारी स्विकारत सर्व गोष्टी कशाप्रकारे हाताळल्या हे सांगितलं आहे.
-
. सोशल मीडियावर लिसा चांगलीच सक्रिय असते. लिसाने तिच्या तिनही गरोदरपणाचा काळ चांगलाच एन्जॉय केला असून बेबी बंपमधील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
लिसाला अनेकदा तिच्या या फोटोंमुळे तसचं तीन मुलांची आई झाल्याने ट्रोल करण्यात आलंय. ट्रोल करणाऱ्यांना लिसा सडेतोड उत्तर देताना दिसते.
-
लिसाने २०१६ साली डीनो ललवानीसोबत लग्न केंल होतं.
-
. लिसा हेडनने ‘आयशा’, ‘हाऊसफुल ३’, ‘क्वीन’ सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवली. ‘क्वीन’ चित्रपटात कंगनासोबत लिसाने केलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. (All Photo-Instagram@lisahaydon)
चार वर्षात तीन मुलं; बाळाला स्तनपान करतानाचं अभिनेत्रीचं फोटोशूट चर्चेत
लिसा जून महिन्यात तिसऱ्यांदा आई झाली असून तिने एका मुलीला जन्म दिला आहे.
Web Title: Lisa haydon share breastfeeding photo shoot goes viral on social media kpw