-
सोनम कपूरची बहीण रिया कपूरने १४ ऑगस्ट रोजी बॉयफ्रेंड करण बूलानीसोबत सात जन्मांसाठी लग्नगाठ बांधली. रिया आणि करणचे लग्न कुटुंबातील सदस्य आणि काही जवळत्या मित्र-मैत्रीणींच्या उपस्थितीत पार पडलं. त्यानंतर आता सोनम कपूरने बहिणीच्या लग्नातील काही फोटोज शेअर केले आहेत.
-
बहिण रिया कपूरच्या लग्नात सोनम कपूर गॉर्जियस ट्रेडिशनल लुकमध्ये दिसून आली.
-
बहिण रियासोबतचे फोटोज शेअर करत तिने लिहिलं, "एकमेकांच्या जवळ असो किंवा मग दूर…आम्ही दोघी बहिणी कायम मनाने जोडले राहणार. अशा सुंदर नवरीची मी बहिण असल्याचा मला अभिमान आहे. लव यू रिया कपूर."
-
याव्यतिरिक्त सोनम कपूरने बहिणीचा पती करण बूलानीसोबतचे सुद्धा काही फोटोज शेअर केले आहेत. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, "तू कायम आमच्या कुटूंबाचाच एक भाग असणार आहेस. तुझी मैत्री मेहूण्याच्या नात्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त महत्त्वाची आहे. पण तुझ्यासाठी खूप आनंद होतोय. लव यू करण बूलानी."
-
यानंतर सोनमने पती आनंद आहुजासोबतचे फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही पारंपारिक पोशाखात एकमेकांना मॅच करणाऱ्या लूकमध्ये दिसून आले.
-
या फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सोनम कपूरने #everydayphenomenal या हॅशटॅगसह फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये बहिण रियाचं लग्न होताना दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे झळकत होता.
-
एका फोटोमध्ये सोनम कपूर थोडी भावूक झालेली दिसून आली. बहिण लग्न होताना पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद तर झळकत होताच. पण बहिण आपल्यापासून दूर जाणार या भावनेने ती भावूक सुद्धा झाली. एका फोटोमध्ये सोनम तिचा पती आनंद आहुजाचा हात पडकडून भावूक झालेली दिसून येत आहे.
-
बहिणीच्या लग्नात सोनम कपूरचं भावूक होणं हे सहाजिकच आहे.
-
रिया कपूरच्या लग्नात सोनमने सॉफ्ट ब्लू अनारकली ड्रेस परिधान केला होता.
-
सोनम या अनारकली सूटमध्ये चांदीचा गोटा पॅटी वर्क आणि गळ्यात गुलाबी फुलांची नक्षी तिच्या या अनारकली ड्रेसवर दिसून आली. यासह तिने कुंदन, मोती आणि पन्ना मांगटीका घातला होता.
-
सोनम कपूरने बहिणीच्या लग्नातील फोटो शेअर केल्यानंतर तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्स करत शुभेच्छा देताना दिसून आले आहेत.
-
रिया कपूर आणि करण बूलानी यांनी एकमेकांना 12 वर्षे डेट केल्यानंतर अखेर लग्न केलं. दोघांची लव्हस्टोरी 'आयशा' चित्रपटाच्या सेटवर सुरु झाली.
-
तिथून दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू त्याचे रुपांतर प्रेमात झाले. लग्नाआधीही दोघे अनेकदा एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवताना दिसले होते.
Unseen Photos: बहिणीच्या लग्नात झाली भावूक झाली सोनम कपूर; शेअर केले लग्नातील फोटोज
बहिण रिया कपूरच्या लग्नात सोनम कपूर गॉर्जियस ट्रेडिशनल लुकमध्ये दिसून आली. बहिणीसाठी लिहिली खास कॅप्शन.
Web Title: Sonam kapoor shares unseen pictures from rhea kapoors wedding prp