-
'आई कुठे काय करते' या मालिकेला सध्या प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय.
-
या मालिकेत सध्या संजना आणि अनिरुद्धच्या लग्नाची तयारी सुरु आहे.
-
गेली कित्येक वर्ष ती ज्या दिवसाची वाट पहात होती तो दिवस आता जवळ आलाय. ३० ऑगस्ट ही या दोघांच्या लग्नाची तारीख पक्की झाली आहे
-
लग्नामध्ये संजना नटण्याची सर्व हौस भागवून घेणार आहे. गुलाबी रंगाच्या साडीतला तिचा ब्रायडल लूक सध्या व्हायरल होतोय.
-
आई कुठे काय करते मालिकेतल्या संजनाच्या लूकची नेहमीच चर्चा राहिली आहे.
-
लग्नासाठी संजनाने गुलाबी रंगाची सुंदर नक्षी असलेली सिल्क साडी परिधान केलीय. या साडीवर तिने हिरव्या रंगाचं ब्लाउज परिधान केलंय.
-
संजनाने हातात हिरवा चुडा घातला. तर कोणतीही हेवी ज्वेलरी न घालता तिने मोती आणि कुंदन असलेला एक सुंदर नेकलेस घातला आहे.
-
खास हेअर स्टाइल आणि कमी मेकअप असून सुद्धा या ब्रायडल लूकमध्ये संजना सुंदर दिसतेय.
-
अनिरुद्धच्या नावाची मेहेंदीही तिच्या हातावर सजली आहे.
-
मात्र आता मालिकेमध्ये अनिरुद्धसोबत लगीनगाठ बांधून देशमुखांच्या घरात गृहप्रवेश करण्याचं तिचं स्वप्न पूर्ण होणार का याची उत्सुकता आता वाढली आहे.
नवरी नटली…, ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजनाचा ब्रायडल लूक चर्चेत
Web Title: Aai kuthe kai karte anirudh sanjana weeding bridal look viral kpw