• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. is urfi javed grand daughter of javed akhtar shabana azmi reveals truth vsk

उर्फी जावेद ही जावेद अख्तर यांची नात? व्हायरल मेसेजवर शबाना आझमींनी दिलं उत्तर…

September 8, 2021 14:43 IST
Follow Us
  • बिग बॉस ओटीटी या रिऍलिटी शोची माजी स्पर्धक उर्फी जावेद सध्या आपल्या बोल्ड आणि ब्युटिफूल लुक्समुळे चर्चेत आहे. नुकताच तिचा एअरपोर्ट लूक चर्चेचा विषय ठरला आहे. तिच्या नावामुळे तिचा संबंध गीतकार जावेद अख्तर यांच्याशी जोडला जात आहे.
    1/10

    बिग बॉस ओटीटी या रिऍलिटी शोची माजी स्पर्धक उर्फी जावेद सध्या आपल्या बोल्ड आणि ब्युटिफूल लुक्समुळे चर्चेत आहे. नुकताच तिचा एअरपोर्ट लूक चर्चेचा विषय ठरला आहे. तिच्या नावामुळे तिचा संबंध गीतकार जावेद अख्तर यांच्याशी जोडला जात आहे.

  • 2/10

    काही जणांना ती जावेद अख्तर यांची नातेवाईक आहे असं वाटत आहे तर काही जणांना ती जावेद अख्तर यांची नात आहे असं वाटत आहे. पण आता या सगळ्या चर्चांना शबाना आझमी यांच्या उत्तराने पूर्णविराम मिळाला आहे.

  • 3/10

    जावेद अख्तर यांच्या पत्नी शबाना आझमी यांनी नुकतंच स्पष्टीकरण दिल्याचं वृत्त आजतकने दिलं आहे. उर्फीशी आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

  • 4/10

    तर उर्फी जावेद हिनेही या सगळ्या चर्चा चुकीच्या असल्याचं आपल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे. केवळ आपल्या नावात जावेद असल्याने त्याचा संबंध जावेद अख्तर यांच्याशी जोडला जात असल्याचं तिने म्हटलं आहे.

  • 5/10

    २४ वर्षीय उर्फी जावेद सध्या सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. तिने आत्तापर्यंत बऱ्याच मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या आहेत.

  • 6/10

    बडे भैय्या की दुल्हनिया, मेरी दुर्गा, बेपनाह, पंचबीट २ अशा काही मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.

  • 7/10

    तिने बिग बॉस ओटीटी या रिऍलिटी शोमध्येही आपला सहभाग नोंदवला होता. मात्र ती पहिल्या आठवड्यातच शोमधून बाहेर पडली. पण तिच्या फॅशन सेन्समुळे ती चर्चेत राहिली आहे.

  • 8/10

    उर्फी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. ती कायम वेगवेगळ्या पोशाखातले आपले फोटो शेअर करत असते. ती आपले कपडे स्वतःच डिझाईन करते.

  • 9/10

    उर्फी गेल्या काही दिवसांमध्ये एअरपोर्टवर आपली ब्रा फ्लॉन्ट करताना आढळून आली होती. त्यावरुन ती बरीच ट्रोलही झाली होती. उर्फी सगळं प्रसिद्धीसाठी करत आहे, असा आरोपही तिच्यावर करण्यात आला होता.

  • 10/10

    या सगळ्याला उत्तर देताना ती म्हणाली होती की, जर प्रसिद्धीच हवी असती तर कपडे न घालता गेले असते. ती म्हणाली की मला ट्रोलर्समुळे काहीही फरक पडत नाही.

Web Title: Is urfi javed grand daughter of javed akhtar shabana azmi reveals truth vsk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.